१९३ स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:43+5:30
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण नसून मागील १६ दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रु ग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.

१९३ स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २१४ जणांचे स्वॅब नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी रविवारपर्यंत (दि.२६) १९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण नसून मागील १६ दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रु ग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.
बाहेर जिल्हा अथवा राज्यातून येणाया नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहे. परवानगी पासेस असणाऱ्यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर उपचार सुरू केले जात आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. यासर्व उपाययोजनांमुळेच गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रत्येकी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर आणि २ कोविड रु ग्णालय स्थापन करण्यात आले आहे. तसेच सध्या ५ व्हेंटिलेटर उपलब्ध असून अजून १२ व्हेटिंलेटर आणि ३ हजार पीपीई किटची मागणी करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सध्या स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. यामुळे बराच वेळ जात असून आता लवकरच येथील शासकीय महाविद्यालयात कोरोना स्वॅब नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून वेळीच रु ग्णावर उपचार करण्यास मदत होणार आहे.
६ क्वारंटाईन कक्षात ४५ जण
जिल्ह्यातील ६ क्वारंटाईन कक्षात सद्यस्थितीत ४५ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे २१, एम.एस. आयुर्वेदिक कॉलेज येथे २, ग्राम चांदोरी येथे १५, ग्राम येगाव येथे १, तिरोडा येथील नगर परि,द लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे २ आणि ग्राम घटेगाव ४ अशा एकूण ४५ व्यक्तींचा समावेश आहे.