आरटीईच्या तिसऱ्या फेरीत १८३ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:06 IST2018-06-17T00:06:15+5:302018-06-17T00:06:15+5:30
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे.

आरटीईच्या तिसऱ्या फेरीत १८३ विद्यार्थ्यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्के अंतर्गत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी २ हजार ११२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. तर तिसºया सोडतीत १८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित नामांकित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सत्र २०१८-१९ मध्ये आॅनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. १३७ शाळांनी बालकांना प्रवेश देण्याकरीता शाळांची नोंदणी केली आहे. १३७ शाळांमधील १०२९ जागेकरीता २ हजार ११२ पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी केली आहे.
सदर प्रक्रियेचा पहिला ड्रा (लॉटरी) १२ मार्च रोजी झाला. त्यानंतर पुन्हा १९ एप्रिलला ही सोडत झाली. दोन्ही सोडतीत १००६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील ८२४ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.तिसरी सोडत १२ जूनला काढण्यात आली. यात १८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्यार्थ्यांची नावे २० जूनपर्यंत दिलेल्या शाळेत दाखल करायची आहेत. यासाठी पालकांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले संदेश मिटवू नये. पालकांनी शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे.
सबळ कारणांशिवाय प्रवेश नाकारता येणार नाही
कोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणारी शाळा कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे. ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाल्याचे वय (विद्यार्थ्याचे) कमीत कमी ५ वर्ष ८ महिने पूर्ण असावे, ६ वर्ष ११ महिने २९ दिवस पेक्षा अधिक असू नये.