दोन दिवसांत १६.३० लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कर न भरल्याने काहीच होत नाही या आवेशात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्यास सुरूवात ...

16.30 lakh recovery in two days | दोन दिवसांत १६.३० लाखांची वसुली

दोन दिवसांत १६.३० लाखांची वसुली

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । तीन दुकानांना ठोकले सील, व्यापाऱ्यांंमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर न भरल्याने काहीच होत नाही या आवेशात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्यास सुरूवात करताच व्यापारी नमले आहेत. यातूनच कर वसुली पथकाने दोन दिवसांत चक्क १६ लाख ३९ हजार ९०३ रूपयांची कर वसुली केली आहे. कर वसुली पथकाने तीन दुकानांना सील ठोकले असून यामुळेच आता व्यापाºयांचा प्रतिसाद मिळत असून खिशातून पैसेही निघत असल्याचे चित्र आहे.
नगर परिषदेच्या दुकानांत मागील कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले व्यापारी भाडे व मालमत्ता कर चुकवित आहेत. यामुळे त्यांच्यावर थकबाकी झाली असून याचा परिणाम मात्र नगर परिषदेचा कारभार चालविण्यावर होत आहे. विद्यमान मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी कर विभागाचा आढावा घेतला असता त्यांना ही बाब लक्षात आली. यावर त्यांनी वाढत चाललेल्या थकबाकीवर आळा घालण्यासाठी कर विभागातील कर्मचाºयांना कर वसुली मोहीम सुरू करण्यास सांगीतले. तसेच कुणीही कर भरण्यास नकार देत असल्यास कोणत्याही प्रकारचा दबाब आणत असल्यास थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले. यातूनच कर वसुली पथकाने गुरूवारी (दि.५) इंदिरा गांधी स्टेडियम मधील एक तसेच फुटपाथवरील दोन दुकानांना सील ठोकले. पथकाने केलेल्या या कारवाईचा धसका घेत व्यापारी लगेच नरमले व कराचा भरणा करण्यासाठी तयार झाले. यातूनच पथकाला गुरूवारी (दि.५) मालमत्ता करापोटी रोख तीन हजार १२० रूपये व पुढील तारखेचे एक लाख ३३ हजार २५३ रूपयांचे धनादेश प्राप्त झाले. तर दुकान भाडेपोटी चार लाख दोन हजार ८३२ रूपयांचे धनादेश व एक लाख ७६ हजार रूपये असे एकूण सात लाख १५ हजार २०५ हजार रूपयांची वसुली केली.शुक्रवारी (दि.६) पथकाने मालमत्ता करापोटी ५६ हजार ६९८ रूपयांचे धनादेश मिळविले.तर दुकान भाड्याचे पाच लाख १८ हजार रूपयांचे धनादेश व रोख तीन लाख ५० हजार रूपये असे एकूण आठ लाख ६८ हजार रूपये वसुल केले. म्हणजेच, दोन दिवसांच्या या कारवाईत पथकाने एकूण १६ लाख ३९ हजार ९०३ रूपयांची कर वसुली केली आहे. मुख्याधिकारी घुगे यांच्या आदेशानंतर पथकाने थेट दुकान सील करण्यास सुरूवात केल्याने व्यापाºयांनी धसका घेतला असून आता त्यांच्या खिशातून पैसेही निघत असल्याचे दिसत आहे.

या दुकानांना ठोकले सील
कर वसुली पथकाने किशोर लारोकर यांच्या नावाने इंदिरा गांधी स्टेडियममधील दुकान क्रमांक १६ मधील सारथी कलेक्शन या दुकानाला गुरूवारी सील ठोकले. त्याचप्रकारे फुटपाथ वरील कैलाश पाल यांच्या दुकान क्रमांक २९, सुरेंद्र गंगवानी यांच्या दुकान क्रमांक २० व गीता चेलानी यांच्या दुकान क्रमांक २१ या दुकानांना सील ठोकल्याची माहिती आहे. तर दुकान क्रमांक ६ ला सील ठोकले जाणार होते मात्र प्रकाश तांडेकर या व्यापाºयाने लगेच पैसे दिल्याने त्यांची दुकान सोडण्यात आली.

Web Title: 16.30 lakh recovery in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.