१५३ गावांत मिळणार मोफत गॅस
By Admin | Updated: August 8, 2015 02:03 IST2015-08-08T02:03:13+5:302015-08-08T02:03:13+5:30
ग्रामीण भागातील जनतेने वृक्षतोड करु नये तसेच इंधनाची सोय सहजरित्या गरीबांना उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने महसूल

१५३ गावांत मिळणार मोफत गॅस
बीपीएलधारक होणार लाभार्थी : २५ आॅगस्टपर्यंत राबविणार मोहीम
विजेंद्र मेश्राम खातिया
ग्रामीण भागातील जनतेने वृक्षतोड करु नये तसेच इंधनाची सोय सहजरित्या गरीबांना उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने महसूल विभागांतर्गत स्वर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील १५३ गावातील बीपीएल धारकांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.
शासन आपल्या दारी या ब्रिदला घेऊन महसूल विभागाने ३ ते २५ आॅगस्ट दरम्यान स्वर्णजयंती महाराजस्व अभियान राबविणे सुरु केले आहे. या अभियांनातर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी अर्ज मागविले आहे. त्याच प्रमाणे सातबारा वाचन, आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थ्यांची नावे वाचवून दाखविणे, सुटलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणे, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांची वाचन करणे, मृत लाभार्थ्यांचे नाव कळविणे व नविण अर्ज, गावातील अपंग व अंध व्यक्तिची यादी तयार करणे, स्वस्त धान्य दुकानाचे वाटप नोंदवही व डिवन नोंदवहीचे वाचन करणे, बीपीएल धारकांचा शोध घेऊन त्यांना गॅस कनेक्शनसाठी अर्ज करण्यासाठी प्रवृत करण्याचे काम या अभियानातून होणार आहे.
वारसानचा फेरफार घेणे, मृत खाते धारकांचे नाव शोधुन काढणे, बोझा गहाण नोंदी घेणे, पाण्याच्या साधनांच्या नोंदी घेणे, शर्तभंग प्रकरणांची तपासणी करणे, झाडांच्या नोंदी घेणे हे काम १६ दिवस चालणाऱ्या शिबिरातून करण्यात येणार आहे.