शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

दोन तालुक्यातील ३६ गावांवर १.५१ कोटींची पाणीपट्टी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:27 IST

बिल थकीत : वसुलीसाठी सरपंच, ग्रामसेवकांच्या पुढाकाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांवर पाणीपट्टीचे १ कोटी ५१ लाख ३२ हजार ५१० रुपये थकीत आहेत. ती रक्कम नळ कनेक्शनधारकांनी भरण्यासाठी ग्रामपंचायतने मोहीम राबविण्याची गरज आहे.

कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापीटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. परिणामी ३६ गावांवर १ कोटी ५१ लाख ३२ हजार ५१० रुपये थकीत आहेत. आमगाव तालुक्यातील २५ गावांवर बोरकन्हार ४ लाख ४३ हजार ४४० रुपये, बाह्मणी ६ लाख ६५ हजार ४४४ रुपये, शिवनी ७ लाख ८७ हजार ५१२ रुपये, चिरचाळबांध ६ लाख ९१ हजार ७० रुपये, खुर्शिपार ४ लाख ३९ हजार ९२७ रुपये, जवरी ५ लाख ८८ हजार ८९२ रुपये, मानेगाव २ लाख ६० हजार ७२० रुपये, ठाणा १ लाख ५३ हजार ४७२ रुपये, बोथली ५ लाख ६ हजार ४२० रुपये, सुपलीपार ५ लाख ३७ हजार ३८४ रुपये, कालीमाटी ६ लाख ६३ हजार ४१० रुपये, किकरीपार ७ लाख ९७ हजार ७५६ रुपये, कातुर्ली १२ लाख ४० हजार ६१२ रुपये, मोहगाव ४ लाख २१ हजार १२४ रुपये, बंजारीटोला ५ लाख ८ हजार ९९६ रुपये, ननसरी २ लाख २० हजार १२४ रुपये, सरकारटोला ३ लाख १९ हजार ५६० रुपये, घाटटेमनी १ लाख ४४ हजार ३५० रुपये, पानगाव २ लाख ७७ हजार ३८६ रुपये, फुक्कीमेटा ३ लाख ९६ हजार ६४४ रुपये, धामणगाव २ लाख १५ हजार ९७४ रुपये, मुंडीपार १ लाख ९ हजार ९५० रुपये, भोसा २ लाख ५७ हजार १३२ रुपये, पाऊलदौणा १ लाख ३८ हजार ३०८ रुपये, नंगपुरा १ लाख ८६ हजार १८४ रुपये थकीत आहेत. 

चार गावांवर १८ लाखसालेकसा तालुक्यातील ४ गावांवर १८ लाख ८०४ रुपये थकीत आहेत. यात साखरीटोला ९ लाख ६१ हजार ८०८ रुपये, कारुटोला १ लाख ६२ हजार ५१४ रुपये, सातगाव ३ लाख ५७ हजार ४९६ रुपये, हेट्टी ३ लाख १८ हजार ९८६ रुपये थकीत आहेत.

आमगाव नगरपरिषदेवर २३ लाख रुपये थकीतआमगाव नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ८ गावांपैकी ७ गावे या योजनेचे पाणी वापरत आहेत. यात या ७ गावांवर २३ लाख ५९ हजार ९१५ रुपये थकीत आहेत. त्यात पदमपूर, रिसामा, बिरसी, बनगाव, किडंगीपार, कुंभारटोली, आमगाव व (गणेशपूर) या गावांचा समावेश आहे.

"बनगाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी वापरणाऱ्या सर्व सरपंच- सचिवांनी आपापल्या ग्रामपंचायतकडे प्रलंबित असलेल्या पाणीपट्टी देयकांचा तत्काळ भरणा करावा. जेणेकरून पाणी वाटपात अडचण येणार नाही."- जगदीश शर्मा, सामाजिक कार्यकर्ता,आमगाव

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणीbillबिलgondiya-acगोंदिया