मतदानासाठी १४७२ कंट्रोल तर १८५३ बॅलेट युनिट वितरित
By Admin | Updated: October 11, 2014 23:10 IST2014-10-11T23:10:05+5:302014-10-11T23:10:05+5:30
जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांसाठी एक हजार २३४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर निवडणूक आली असून जिल्हा निवडणूक विभागाने सर्व मतदान

मतदानासाठी १४७२ कंट्रोल तर १८५३ बॅलेट युनिट वितरित
गोंदिया : जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांसाठी एक हजार २३४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर निवडणूक आली असून जिल्हा निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रांसाठी मशीनचे (बॅलेट व कंट्रोल युनिटचे) वितरण केले आहे. निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रांना मतदान, प्रशिक्षण व राखीव अशा एकूण एक हजार ४७२ कंट्रोल युनिट तर एक हजार ८५३ बॅलेट युनिट्सचे वितरण केले आहे. यात सर्वाधिक मशीन गोंदिया विधानसभा क्षेत्राला देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३०६, तिरोडा क्षेत्रासाठी २८९, गोदिया क्षेत्रासाठी ३३७ तर आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३०२ मतदान केंद्रांतून ही निवडणूक घेतली जाईल. त्यादृष्टीने निवडणूक विभागाने अर्र्जुुनी मोरगावला ३०६, तिरोडाला २८९, आमगावला ३०२ तर गोंदियाला ६७४ बॅलेट युनिट वितरीत केले आहेत.
याशिवाय जिल्हा निवडणूक विभागाने राखीव म्हणून अर्जुनी मोरगावला ३१ कंट्रोल व बॅलेट युनिट, तिरोडाला ३० कंट्रोल व बॅलेट युनिट, आमगावला ३१ कंट्रोल व बॅलेट युनिट तर गोंदियाला मात्र ७० बॅलेट व ३५ कंट्रोल युनिट दिले आहेत. शिवाय प्रशिक्षणासाठी अर्जुनी मोरगाव, तिरोडा व आमगाव विधानसभा क्षेत्राला प्रत्येकी १५ कंट्रोल व बॅलेट युनिट दिले असून गोंदियाला १८ युनिट्स देण्यात आले आहेत.
अशाप्रकारे विभागाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला ३६७ कंट्रोल व बॅलेट युनिट, तिरोडाला ३४३ कंट्रोल व बॅलेट युनिट, आमगावला ३६३ कंट्रोल व बॅलेट युनिट तर गोंदिया विधानसभा क्षेत्राला ३९९ कंट्रोल व ७८० बॅलेट युनिट्स वितरीत केले आहेत.
विशेष म्हणजे विभागाने या सर्व युनिट्सची टेस्टींग केली असून हमी झाल्यावरच त्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वितरण केले आहे. (शहर प्रतिनिधी)