शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१४१ पैकी १३९ स्वॅब नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. तर कोरोबाधीत जिल्हा अथवा राज्यातील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्दे१८ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात : दोन नमुन्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण १४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३९ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीत महाविद्यालयाला मंगळवारपर्यंत (दि.२१) प्राप्त झाला आहे. सर्व १३९ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आढळले असून केवळ दोन नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. तर कोरोबाधीत जिल्हा अथवा राज्यातील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. परवानगी पासेस असलेल्या व्यक्तींनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. तर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिल्यास त्यांना आरोग्य विभागातर्फे शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. त्यामुळेच मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या आवश्यक उपाययोजनामुळे जिल्हा कोरोनामुक्त आहे.जिल्ह्यातील तीन शासकीय क्वारंटाईन कक्षात सध्या १८ जण उपचार घेत आहेत.यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज १०, सडक अर्जुनी १ आणि चांदोरी ७ अशा एकूण १८ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके यांनी दिली.जिल्हा बंदीमुळे अडकले अधिकारी व कर्मचारीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर कोरोनाबाधीत जिल्ह्यातील नागरिकांचा जिल्ह्यात प्रवेश होवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहे. पवानगी पासेस शिवाय कुणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून अपडाऊन करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.यादी करण्याचे निर्देशकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सध्या आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा व्यस्त आहे. तसेच सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या आहे. मात्र यानंतरही काही अधिकारी आणि कर्मचारी अपडाऊन करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बाहेरुन अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश देऊ नये अश्या सूचना दिल्याची माहिती आहे. तसेच अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयारी करण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या