रूग्णांसाठी 1272 खाटा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:15+5:30

येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डी.सी.एच) १०० खाटांची क्षमता असून ३५ रूग्ण भरती असल्याने ६५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून ४० रूग्ण भरती असल्याने १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून ३१ रूग्ण भरती असल्याने ११९ खाटा उपलब्ध आहेत.

1272 beds available for patients | रूग्णांसाठी 1272 खाटा उपलब्ध

रूग्णांसाठी 1272 खाटा उपलब्ध

Next
ठळक मुद्देएकूण १७६६ खाटांची सुविधा : सध्या ४९४ रुग्ण भरती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णावर उपचार करता यावे यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील १५ शासकीय रुग्णालय आणि ६ खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १७६६ खाटांची क्षमता आहे. रविवारी (दि.४) ४९४ रुग्ण भरती असून १२७२ खाटा कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डी.सी.एच) १०० खाटांची क्षमता असून ३५ रूग्ण भरती असल्याने ६५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून ४० रूग्ण भरती असल्याने १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून ३१ रूग्ण भरती असल्याने ११९ खाटा उपलब्ध आहेत.
कोविड रुग्णालय तिरोडा (डीसीएचसी) मध्ये २० खाटांची क्षमता असून १० रूग्ण भरती असल्याने १० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स (मरारटोली) येथे १०६ खाटांची क्षमता असून २० रूग्ण भरती असल्याने ८६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये २८० खाटांची क्षमता असून ५५ रूग्ण भरती असल्याने २२५ उपलब्ध आहेत. कोविड सेंटर तिरोडा (सरांडी) येथे १२० खाटांची क्षमता असून ४७ रूग्ण भरती असल्याने ७३ खाटा उपलब्ध आहेत.
तसेच कोविड सेंटर आमगाव येथे ५२ खाटांची क्षमता असून ४ रूग्ण भरती असल्याने ४८ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर सडक-अर्जुनी येथे ८० खाटांची क्षमता असून १३ रूग्ण भरती असल्याने ६७ खाटा उपलब्ध आहेत.
कोविड सेंटर गोरेगाव येथे ९० खाटांची क्षमता असून १४ रूग्ण भरती असल्याने ७६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर देवरी येथे ८० खाटांची क्षमता असून ६ रूग्ण भरती असल्याने ७४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर चिचगड येथे १०० खाटांची क्षमता असून एकही रूग्ण नसल्याने सर्व १०० खाटा उपलब्ध आहेत.
कोविड सेंटर सालेकसा येथे ८० खाटांची क्षमता असून ४६ रूग्ण भरती असल्याने ३४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर अर्जुनी-मोरगाव येथे ८० खाटांची क्षमता असून १० रूग्ण भरती असल्याने ७० खाटा उपलब्ध आहेत. तर कोविड सेंटर नवेगावबांध येथे ६० खाटांची क्षमता असून ३ रूग्ण भरती असल्याने ५७ खाटा उपलब्ध आहेत.
तर खाजगी रुग्णालयांपैकी सेंट्रल हॉस्पिटल गोंदियामध्ये ७४ खाटांची क्षमता असून ६५ रूग्ण भरती असल्याने ९ खाटा उपलब्ध आहेत. सहयोग हॉस्पिटल गोंदियामध्ये ६६ खाटांची क्षमता असून ३३ रूग्ण भरती असल्याने ३३ खाटा उपलब्ध आहेत.
श्री राधे कृष्णा हॉस्पिटल गोंदियामध्ये ४० खाटांची क्षमता असून २४ रूग्ण भरती असल्याने १६ खाटा उपलब्ध आहेत. बाहेकार हॉस्पिटल गोंदियामध्ये ३० खाटांची क्षमता असून ३० रूग्ण भरती असल्याने खाटा उपलब्ध नाहीत.
के.एम.जे हॉस्पिटल गोंदिया येथे ९ खाटांची क्षमता असून ७ रूग्ण भरती असल्याने २ खाटा उपलब्ध आहेत. तर मीरावंत हॉस्पिटल गोंदिया येथे ९ खाटांची क्षमता असून १ रूग्ण भरती असल्याने ८ खाटा उपलब्ध असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी कळविले आहे.
 

Web Title: 1272 beds available for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.