शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१२३.५० हेक्टर जंगलात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:59 IST

उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० हेक्टर क्षेत्रात याचे परिणाम जाणवले आहे.

ठळक मुद्देएफडीसीएमचे क्षेत्र : मार्च महिन्यात सर्वाधिक ३५ घटना, देवरी वन प्रकल्पात १६ घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० हेक्टर क्षेत्रात याचे परिणाम जाणवले आहे.उन्हाची दाहकता वाढल्यास आगीचे प्रकारही वाढतात. उष्णतेमुळे जंगलातील सुकलेला पाला-पाचोळा लवकरच पेट धरतो व पुढे त्याचे आगीच्या भडक्यात रूपांतर होते. या वणव्यात मोठमोठाले जंगल राखेत बदलायला वेळ लागत नाही. या वणव्याच्या घटनेने जंगल जळून खाक होत असतानाच वन्य पशूंनाही याचा फटका सहन करावा लागतो. जिल्ह्यातही वणव्याच्या अशा या घडत आहेत. येथे जानेवारी ते मार्च या कालावधीत वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात वणव्याच्या एकूण ३६ घटना घडल्याची नोंद आहे.यामध्ये, मार्च महिन्यात ३५ घटना घडल्या असून एप्रिल महिन्यातील घटनांची माहिती नाही. तरिही मार्च महिन्यातील घटनांपेक्षा जास्त घटना घडल्यास आश्चर्य नाही असे म्हटले जात आहे. देहरादून येथील सॅटेलाईट चॅनलकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे वणव्याच्या घटनांची तपासणी करण्यात आली व त्यानंतरच ही आकडेवारी देण्यात आली आहे. जंगलातील वणव्याच्या या घटनांत आग पसरू नये यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले.विशेष म्हणजे, वाळलेला पालापाचोळा जळल्यानंतर पसरणारी आग नियंत्रीत करण्यासाठी जाड रेषा बनविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. जंगलातील झाडांवरून पडलेली वाळलेली पाने आगीला दूरवर नेते. यावर जाड रेषा ही आग नियंत्रीत करण्यासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होते. वेळीच करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वणव्यावर नियंत्रण मिळविता आले व त्यामुळे वन संपत्तीही बचावली.२७.५० हेक्टर वन क्षेत्र आगीच्या विळख्यातजिल्ह्यात घडलेल्या या घटनांत सर्वाधिक घटना देवरी वन प्रकल्प विभागात नोंद करण्यात आल्या आहेत. या विभागात एकूण १६ घटनांची नोंद असून २७.५० हेक्टर वन क्षेत्र आगीच्या विळख्यात आले आहे. तर सर्वाधिक वन क्षेत्र जांभळी-२ मध्ये आगीत आले. गोंदिया-डोंगरगाव वन प्रकल्प विभागात ४ घटना घडल्या असून ६४.५० हेक्टर तर अर्जुनी-मोरगाव वन प्रकल्प विभागात ३ घटना घडल्या असून यात ७.५० हेक्टर क्षेत्र आगीच्या हवाली झाले.वणव्याच्या ३६ घटना घडल्या आहेत. मात्र यामुळे रोपवनांचे नुकसान झाले नाही. या घटनांत जमिनीवर पडलेला पालापाचोळा जळाला. पूर्व तयारी व वेळीच पाऊल उचलल्यामुळे त्रास झाला नाही.-पी.जी. नौकरकरविभागीय प्रबंधक, एफडीसीएम लि. वन प्रकल्प गोंदिया

टॅग्स :fireआग