शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

११ कोटींची उपकरणे मात्र औषधासाठी पैसे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 6:00 AM

गोंदियाला वैद्यकीय महाविद्यालय आणण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना चांगला उपचार मिळावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उपकरणे नव्हती आता महिनाभरात ११ कोटीं पेक्षा अधिक रूपयांची विविध उपकरणे येणार आहेत.

ठळक मुद्देमेडीकल कॉलेज आॅक्सिजनवर : गरीब रूग्णांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक उपकरणांची कमतरता असल्यामुळे ११ कोटी ३ लाख १५ हजार ८१५ रूपयांची विविध उपकरणे पुरवली जात आहेत. परंतु याच वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रूग्णांसाठी साधी औषधी उपलब्ध नसल्याची ओरड रूग्णांची आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना डॉक्टर सेवा देतील परंतु औषधी बाहेरून आणण्याचा सल्ला दिला जात आहे.गोंदियाला वैद्यकीय महाविद्यालय आणण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना चांगला उपचार मिळावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उपकरणे नव्हती आता महिनाभरात ११ कोटीं पेक्षा अधिक रूपयांची विविध उपकरणे येणार आहेत. परंतु येथे डॉक्टरांची कमतरता त्यातच उपलब्ध डॉक्टरांकडून सेवा दिली जात असली तरी रूग्णांना औषध दिले जात नसल्याची बाब पुढे आली आहे.परंतु या प्रकरणाला सावरण्यासाठी दररोज पाच हजार रूपयांची औषधी महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या निधीतून खरेदी करून दिली जात असल्याचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. पी. व्ही. रूखमोडे यांनी सांगितले. परंतु ही पाच हजाराची औषधी कोणत्या रूग्णांना दिली जाते याची माहितीच नाही.बाई गंगाबाई महिला रूग्णालयात होणाºया गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी ५०० रूपये पर्यंतची औषधी डॉक्टर बाहेरुन आणण्यास सांगत आहेत. रूग्णांसाठी बाहेरून औषधी घेऊन आणा असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. यासाठी डॉक्टरांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिल्या आहेत. मेडीकल कॉलेज, गंगाबाई महिला रूग्णालय येथील रूग्णांना लावण्यासाठी इंजेक्शन नाहीत. सिंरींज, निडल, आयव्ही कॅनुला नाही.गंगाबाईत येणाºया गर्भवतींची प्रसूती करण्यासाठी लागणाºया औषधींत कॉर्ड फ्लॅटम, कॅटगॅट नंबर वन, कॅटगॅट नंबर टू,टॅक्सीम इंजेक्शन, बाळंतिनीची शस्त्रक्रिया केल्यानंतर लावण्यात येणारे पिप्झो ४.५ ग्रॅम, स्पायनल निडल नाहीत. सामान्य प्रसूतीसाठी सरव्ह्यूव प्राईल, बेटेडीन, इंजेक्शन ड्रोटीन, स्टाईल ग्लोज नाहीत. औषधे उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांचा गोंधळ आहे. परंतु वैद्यकीय अधिष्ठाता दररोज पाच हजार रूपये एका प्रकारच्या औषधीसाठी खर्च करण्यात येते.प्रत्येक प्रकारच्या औषधासाठी पाच हजार रूपये महात्मा फुले जीवनदायी योजनेतून खर्च करण्यात असल्याचे डॉ. पी. व्ही. रूखमोडे सांगितले. परंतु गंगाबाई महिला रूग्णालयात येणाºया बाळंतिनीना बाहेरून औषधी घेऊन यावे लागते.यासाठी सामान्य प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसाठी ३०० ते ४०० रूपयाचे तर शस्त्रक्रिया होणाºया गर्भवतीसाठी ५०० ते ६०० पर्यंतची औषधी खासगी मेडीकलमधून रूग्णांच्या नातेवाईकांना विकत आणावी लागते. मेडीकल कॉलेजमधील रूग्णांसाठी ३ कोटीची सीटीस्कॅन मशीन, ११ व्हेंटीलेटर, एसएनसीयूमध्ये १२ फाऊलर बेड, दोन सिबीसी मशीन, डीफीलेटर, कॉर्डीक मॉनिटर अशी ११ कोटी ३ लाख रूपयाची उपकरणे महिनाभरात दाखल होत आहेत. परंतु या उपकरणांना ठेवायचे कुठे यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे डॉ. रूखमोडे म्हणाले.मेडीकलमध्ये पीजीचे वर्गगोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात १ नोव्हेंबरपासून पीजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी ४ स्त्रीरोगतज्ज्ञ, ४ बालरोगतज्ज्ञ, २ अस्थीरोगतज्ज्ञ, २ नेत्ररोगतज्ज्ञ असे १२ तज्ज्ञ तर दुसऱ्या वर्षीपासून सोनोग्राफीसाठी दोन तज्ज्ञ दिले जाणार आहेत.रूग्णकल्याण निधीचा पैसे सीएसकडेवैद्यकीय महाविद्यालयात येणाºया रूग्णांकडून ओपीडीच्या वेळी घेण्यात येणारा पैसा जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या खात्यात जात असल्यामुळे त्या पैशाचा वापर औषधांसाठी करता येत नाही. हॉपकिन्सकडून औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा आहे.२ कोटी ८० लाखाचे बिल थकीतसन २०१६ पासून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांसाठी खरेदी करण्यात आलेल्या औषधांचे २ कोटी ८९ लाख रूपयाचे औषधांचे बिल थकीत आहेत. निधी अभावी हे बिल निघाले नाही. शासनाने हे बिल काढले नसल्यामुळे औषधांसाठी रूग्णांना मोठा भूर्दंड सहन करावा लागत आहे.तीन वर्षापासून २५० कोटी पडूनशासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कुडवा येथे २५ एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु मागील तीन वर्षांपासून २५० कोटी रूपये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी पडून असून आतापर्यंत बांधकामाला सुरूवात झाली नाही. पहिल्यांदा मंत्रालयातून या कामाची निविदा झाली. इंदोर येथील ए.के.ए. कन्सलटन्स कंपनीला काम देण्यात आले होते. परंतु त्यांनी काम सुरूच केले नाही. आता पुन्हा दुसºया निविदेची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे ते २५० कोटी पडून आहेत.हॉपकिन्सकडून औषधी आली नाही.रूग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून दररोजच्या औषधासाठी ५ हजार रूपये महात्मा फुले जीवनदायी योजनेतून वापरण्यात येत आहे. रूग्णकल्याण निधीचे पैसे जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे जात असल्याने ते पैसे औषधासाठी वापरता येत नाही.- डॉ. पी.व्ही. रूखमोडेवैद्यकीय अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

टॅग्स :Medicalवैद्यकीय