शहरवासीयांवर १०.५३ कोटी थकीत

By Admin | Updated: January 25, 2015 23:15 IST2015-01-25T23:15:49+5:302015-01-25T23:15:49+5:30

नगर परिषदेच्या कर वसुलीचा विषय सध्या शहरात चांगलाच गाजत असतानाच आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण सुद्धा कर वसुलीसाठी मैदानात उतरली आहे. प्राधिकरणचे शहरवासीयांवर

10.53 crore tired of the city dwellers | शहरवासीयांवर १०.५३ कोटी थकीत

शहरवासीयांवर १०.५३ कोटी थकीत

मजिप्राचे टेंशन वाढले : वसुलीसाठी दोन पथक कामावर
गोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुलीचा विषय सध्या शहरात चांगलाच गाजत असतानाच आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण सुद्धा कर वसुलीसाठी मैदानात उतरली आहे. प्राधिकरणचे शहरवासीयांवर १० कोटी ५३ लाख ८३ हजार ४५३ रूपये पाणीपट्टी करापोटी थकून आहे. वाढत चाललेल्या या आकड्यामुळे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले असून त्यामुळेच त्यांनीही आपले पथक वसुलीसाठी कामावर लावले आहेत.
कर वसुलीत होत असलेल्या ढिलाईमुळे नगर परिषदेचाही आकडा वाढत गेल्याने यंदा त्यांना ११ कोटीचे टार्गेट सर करायचे आहे. यामुळे परिषद वांद्यात आली असून त्यांनीही पथक गठित करून कर वसुली सुरू केली आहे. विशेष म्हणजे या पथकासोबत परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही मैदानात उतरावे लागले आहे. परिणामी शहरात नगर परिषदेची कर वसुली मोहीम चांगलीच गाजत आहे. त्यात आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पथक वसुलीसाठी निघाल्याचे दिसून येत आहे. कारण प्राधिकरणला शहरवासीयांकडून १० कोटी ५३ लाख ८३ हजार ४५३ हजार रूपयांची पाणी पट्टी कर वसुली करायची आहे. प्राधिकरणकडून हा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. तसे प्राधिकरणला पाणी पुरवठा योजना निर्माण करून स्थानीक स्वराज संस्थेला सुपूर्द करायची असते. मात्र नगर परिषदेने येथील योजना आपल्या अधिकारात घेण्यास इच्छा दाखविली नाही. परिणामी प्राधिकरणला इच्छा नसतानाही येथील योजना चालवावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
१०.५३ कोटींची थकबाकी कुणावर
आजघडीला गोंदिया शहराला ११ हजार कनेक्शन्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. त्याचीच थकबाकी १० कोटी ५३ लाख ८३ हजार ४५३ रूपये एवढी आहे. यातील नऊ कोटी ४६ लाख सहा हजार २६९ रूपये घरगुती कनेक्शनधारकांवर, ८६ लाख ३० हजार ७५५ रूपये व्यवसायीक कनेक्शन धारकांवर तर २१ लाख ४६ हजार ४२९ रूपये नगर परिषदेवर थकून आहेत. विशेष म्हणजे शहरवासीयांवर सहा कोटी ३९ लाख ३१ हजार १२३ रूपयांचे पाणीपट्टी कर थकीत आहे. उर्वरीत चार कोटी १४ लाख ५२ हजार ३३० रूपये ही व्याजाची रक्कम आहे. आता शहरवासी पाण्याचे पैसे देत नसताना व्याजाची रक्कम कशी काय देणार असा प्रश्न येथे पडतो.
दोन पथक करताहेत वसुली
शहरवासीयांवर थकून असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी प्राधिकरणने दोन पथक गठित केले आहेत. या पथकात प्रत्येकी पाच जणांचा समावेश असून ते प्राधिकरणचेच कर्मचारी आहेत. हे दोन्ही पथक शहरातील थकबाकीदारांकडे जाऊन थकीत करवसुली करीत आहेत.

Web Title: 10.53 crore tired of the city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.