शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडळात १ हजार गो-ग्रीन ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्याने नागरिकांचा कल आता ऑनलाईन व्यवहारांकडे वाढू लागला आहे.

ठळक मुद्देपरिमंडळात १ हजार गो-ग्रीन ग्राहकऑनलाईन बिल भरणाऱ्यांना सुट : महावितरणचा ग्राहकांसाठी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्यांना महावितरणकडून दमरहा १० रूपये म्हणजेच वार्षिक १२० रूपयांची सुट दिली जाणार आहे. यासाठी ग्राहकांना गो-ग्रीन पर्याय निवडायचा असून त्यांना ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातून बिल पाठविले जाईल. असे असतानाही मात्र गोंदिया परिमंडळात आजघडीला १ हजार ८१ ग्राहक गो-ग्रीनचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे.आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्याने नागरिकांचा कल आता ऑनलाईन व्यवहारांकडे वाढू लागला आहे. यामुळेच कित्येक प्र्रकारचे बिल सुद्धा ऑनलाईन भरून नागरिक मोकळे होत आहेत. महावितरणनेही हीच बाब हेरत ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.यांतर्गत वीज बिल बघण्यासाठी महावितरणने ग्राहकांना अ‍ॅप व संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा असतानाही महावितरणकडून ग्राहकांना छापील बिल दिले जात आहेत. कागदी बिल देताना त्यात कागदाचा वापर आलाच व कागद झाडांपासून तयार होत असल्याने पर्यावरणाचाच हा एक भाग ठरत आहे. अशात पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून दरमहा १० रूपये म्हणजेच वार्षिक १२० रूपयांची सुट जाहीर केली आहे.यासाठी वीज ग्राहकांना गो-ग्रीनचा पर्याय निवडायचा असून त्यांना आपल्या वीज बिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावयाची आहे. मात्र गोंदिया परिमंडळात १ हजार ८१ ग्राहक गो-ग्रीनचा पर्याय निवडणारे असल्याची माहिती आहे.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गो-ग्रीनचा पर्याय अत्यंत उपयुक्त असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी हा पर्याय निवडण्याची गरज आहे.

 

 

टॅग्स :electricityवीज