१०० वर्षांपूर्वी टपाल रजिस्ट्रीचा खर्च तीन आणे
By Admin | Updated: December 31, 2014 23:26 IST2014-12-31T23:26:32+5:302014-12-31T23:26:32+5:30
अलीकडे तंत्रज्ञानाच्या या युगात टपाल व्यवस्थेचा अस्त होत चालला आहे. आधुनिक सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्राचीन संग्रहावर वर्तमन पिढीचा विश्वासच बसत नाही.

१०० वर्षांपूर्वी टपाल रजिस्ट्रीचा खर्च तीन आणे
संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगाव
अलीकडे तंत्रज्ञानाच्या या युगात टपाल व्यवस्थेचा अस्त होत चालला आहे. आधुनिक सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्राचीन संग्रहावर वर्तमन पिढीचा विश्वासच बसत नाही. मात्र प्रत्यक्षात जुन्या जतन केलेल्या वस्तू या पिढीला दाखविल्या तर तोंडावर बोट ठेवण्यावाचून पर्याय उतर नाही. वर्तमान पिढीसाठी वस्तू जतनाचे महत्व कळावे, प्रत्येकाला तशी सवय लागावी, असे मत शतकापूर्वीचे दस्तावेज संग्रह करणारे अर्जुनी/मोरगाव येथील घनश्याम मेहता यांनी व्यक्त केले.
आजच्या गतीमान युगात संवाद व देवाण-घेवाणीची अनेक साधने उपलब्ध आहेत.पूर्वी केवळ टपाल व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागत असे, कुटूंब, नातेवाईक, आप्तेष्टांची सुखदु:ख जाणून घेण्याचे हे एकमेव साधन होते. शंभर वर्षापासूनचे दस्त संग्रही ठेवणे ही साधी बाबत नाही. ही एक कला आहे. असा छंद अगदी मोजक्या लोकांनाच असतो. प्राचीन दगडांच्या मूर्ती, वस्तू कुणीही सहजरित्या जतन करून ठेवतात. मात्र कागदी प्रमाणाचे जतन करणे आश्चर्याची बाब आहे. असाच एक टपाल विभागाचा रजिस्ट्री केलेला लिफाफा ज्याला १८ डिसेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले तो अर्जुनी/मोरगाव येथील घनश्याम मेहता यांनी जनत करून ठेवला आहे. आजही या कागदाची स्थिती एकदम उत्तम आहे.
वर्तमान पिढी नुसती वेळेची बचत, पैशासाठी वणवण, अभ्यास याकडेच आकर्षित झाल्याचे दिसून येते. छंद जोपासण्याची आवड निर्माण करण्याची गरज आहे. त्यावेळची लिपी, साधने हल्लीच्या पिढीला केवळ पुस्तकातून वाचनात येतात. परंतु ती प्रत्यक्षात जर बघायला मिळाली तर कूतुहला वाटते. मेहता यांचे संग्रहात एक बालाघाट येथून राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्याच्या सावरी या गावात रामलाल करणीदान पालीवाल यांना १४ डिसेंबर १९९४ रोजी पाठविण्यात आले. त्यावेळी टपाल रजिस्ट्रीची किंमत केवळ तीन आणे एवढी होती. हे पत्र मेघराज यांनी बालाघाट येथून पाठविले होते. या पत्राशी मेहता यांचा कुठलाही सबंध नाही. मात्र त्यांच्या अंगी असलेली छंद जोपासण्याची कला जागृत झाली. त्यांनी असे पत्र संग्रही ठेवले. बघता-बघता या पत्राला शंभर वर्ष पूर्ण झालेत. त्यांना हे पत्र मोरगाव येथील स्व. देवीदान पालीवाल यांचेकडून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मेहता यांचेजवळ याव्यतिरीक्त अनेक वस्तू संग्रही आहेत. देश-विदेशातील चलन, नाणे त्यांच्या संग्रहात आहेत.
त्यांनी इंग्रजकालीन पायलीचे जतन केले आहे. १८ व्या शतकात भारतावर इंग्रजाचे राज्य होते. त्या काळात सारा वसूलीची पध्दत अमलात होती. शेतकऱ्यांना झालेल्या उत्पादनातील काही वाटा त्या भागात नेमलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना वसूलीचा अधिकार होता. त्यांनी काही विश्वासू लोकांची वसूलीसाठी नेमणूक केली होती. सारा वसूलीत प्रमाणीत मोजमापाचा वापर केला जात होता. मोरगाव येथील वैष्णव परिवाराला सुमारे १९० वर्षापूर्वी एक जुनी पायली इंग्रज अधिकाऱ्यांनी सोपविली होती. सन १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी सर विलींकरून यांनी मोरगावचे पुजारी वैष्णव यांना स्वत:चे नाव कोरलेली प्रमाणित पायली दिली होती. त्यांना त्यावेळी व्यंकटेश्वर साहेत, बालकिसन साहेब या नावाने सुध्दा संबोधले जात होते. ही पायली मेहता यांनी संग्रहीत केली आहे.