अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाचा कारावास
By Admin | Updated: January 28, 2015 23:36 IST2015-01-28T23:36:50+5:302015-01-28T23:36:50+5:30
शहराच्या गौतम नगरातील एका १४ वर्षाच्या मुलीला खोटी माहिती दे ऊन तिला पळवून नेणाऱ्या इसमाने तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणावर जिल्हासत्र न्यायालयाने बुधवारी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाचा कारावास
गोंदिया : शहराच्या गौतम नगरातील एका १४ वर्षाच्या मुलीला खोटी माहिती दे ऊन तिला पळवून नेणाऱ्या इसमाने तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणावर जिल्हासत्र न्यायालयाने बुधवारी सुनावणी केली. या सुनावणीत आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २० हजार रूपये दंड ठोठावला आहे.
सुजीत भुरनदास बोरकर (४१) रा. माताटोली गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. त्याने गोंदियाच्या गौतमनगरातील एका रिक्षा चालकाच्या मुलीला तुझ्या वडीलाची प्रकृती बिघडली आणायला चल म्हणून तिला ८ फेब्रुवारी २०११ रोजी घरातून नेले होते. त्यांनतर तिच्याशी लैंगिक संबध प्रस्तापित केले. या प्रकरणात पिडीत मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३,३६६,३७६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार नंदकुमार काळे यांनी केला होता. या प्रकरणात प्रुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी त्याला १० वर्षाची शिक्षा व २० हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी वकील अँड. विणा बाजपेयी व अॅड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)