शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा राजधानीत मोर्चा

By admin | Updated: June 11, 2015 01:12 IST

पणजी : वेतनवाढीसाठी मागणी करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांना बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला.

पणजी : वेतनवाढीसाठी मागणी करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांना बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला. दुपारच्या वेळी मनपा कामगारांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात बांधकाम विभागाच्या साडेसातशे कामगारांनी सहभाग घेतला. या वेळी साधारण एक हजार कामगारांनी शहरात मोर्चा काढला. महापालिकेने वेतनवाढ द्यावी म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून दुपारच्या वेळेत मनपाचे रोजंदारीवरील साडेतीनशे कामगार निदर्शने करत आहेत. शहरातील कचरा उचलणारे, साफसफाई करणारे तसेच उद्यानाची देखभाल करणारे कामगार आपले सकाळच्या वेळेतील काम पूर्ण करून दुपारी १२.३0 वाजता मनपा इमारतीसमोर एकत्रित येतात. येथे येऊन आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करतात तसेच इमारतीच्या आसपास असलेल्या सर्व भागात मोर्चा काढून वेतनवाढीबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून नारे देतात. शनिवारपर्यंत कामगार अशाप्रकारे निदर्शने करणार. मात्र, मनपाने वेतन वाढीबाबत निर्णय न दिल्यास कामगारांकडून सोमवारपासून कचरा उचलणे बंद करण्यात येईल. बांधकाम खात्याच्या कामगारांनी मनपा कामगारांवर वेतनवाढीबाबत करण्यात येणाऱ्या अन्यायाचा निषेध केला आहे. सरकारच्या अंतर्गत विविध खात्यात, सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचे गट तयार झाले असून कायद्याप्रमाणे होणे गरजेचे असल्याच्या बाबीही लॉबीमुळे लांबणीवर टाकण्यात येतात किंवा कामगारांत फूट घालून त्यांच्या मागणी धुडकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. कामगारांच्या वेतन वाढीचा विषय आला की, सरकारी तिजोरीत निधी नसल्याची कारणे सांगून वेळ मारून नेण्यात येते, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)