भाजपा कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 14:54 IST2018-11-05T14:47:31+5:302018-11-05T14:54:12+5:30

गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव दिया शेटकर यांनी भाजपा नेते सुभाष शिरोडकरांवर गंभीर आरोप केला आहे. शिरोडकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गँगरेपची धमकी दिल्याचा आरोप दिव्या शेटकर यांनी केला आहे.

woman congress worker allrges gang rape threat from supporter of bjp leader | भाजपा कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप

भाजपा कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप

पणजी - गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव दिया शेटकर यांनी भाजपा नेते सुभाष शिरोडकरांवर गंभीर आरोप केला आहे. शिरोडकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गँगरेपची धमकी दिल्याचा आरोप दिव्या शेटकर यांनी केला आहे. या संदर्भात शेटकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांवर दिया शेटकर यांनी आरोप केला आहे. शेटकर यांनी 'रविवारी सकाळी मला एक फोन आला. फोनवर बोलणारी व्यक्ती  शिरोडकर यांच्या कार्यकर्ता असल्याचं सांगत  फोनवरून शिवीगाळ करत होती. अर्वाच्य आणि उद्धट भाषेत माझ्याशी बोलले गेले. तसेच आपल्याला जीवे मारण्याची आणि गँगरेपची धमकी दिल्याचे' सांगितले. शिरोडा क्षेत्रात तुम्ही शिरोडकरांविरोधात आवाज उठवाल तर याद राखा असेही धमकी देणाऱ्याने आपणास बजावले असल्याचेही शेटकर म्हटल्या आहेत. शेटकर यांच्या तक्रारीनंतर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: woman congress worker allrges gang rape threat from supporter of bjp leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.