विधानसभा निवडणूक लढवणार : रोहित मोन्सेरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:58 IST2026-03-28T12:57:01+5:302026-03-28T12:58:02+5:30

महापौरपदासाठी अर्ज : उपमहापौरपदी आगशीकर

will contest goa assembly elections 2027 said rohit monserrat | विधानसभा निवडणूक लढवणार : रोहित मोन्सेरात

विधानसभा निवडणूक लढवणार : रोहित मोन्सेरात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार आहे, अशी माहिती नगरसेवक तथा माजी महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. महापौर निवडणुकीसाठी मोन्सेरात यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते. त्यामुळे आपला महापौरपदाचा कार्यकाळ अल्पवधीचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौरपदासाठी नगरसेवक वसंत आगशीकर यांनी अर्ज दाखल केला.

या दोन्ही पदांच्या निवडीसाठी सोमवारी, दि. ३० रोजी मनपा सभागृहात सकाळी ११ वाजता बैठक होईल. विरोधी गटाकडून अद्याप या पदांसाठी उमेदवारी अर्ज सादर झाले नसल्याने दोघांचीही बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मोन्सेरात म्हणाले, की मी पुढील वर्षी  होणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी यापूर्वीच याची माहिती दिली आहे. मतदारसंघ कुठला असेल हे भाजप पक्ष ठरवेल. त्यामुळे माझा महापौरपदाचा कार्यकाळ अल्पावधी असेल. गेल्या पाच वर्षांत महापौर म्हणून शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. उर्वरित कामेदेखील लवकरच पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले.

मोन्सेरात म्हणाले की, 'सध्या शहरात स्मार्ट सिटीच्या बसेस कार्यरत असून, या सेवेचा विस्तार रायबंदरपर्यंत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.

रस्ते खोदाईस आक्षेप

रोहित मोन्सेरात म्हणाले की, 'गॅस पाइपलाइनच्या कामासाठी शहरातील रस्ते पुन्हा एकदा फोडण्यास मनपाचा आक्षेप आहे. स्मार्ट सिटीची कामे जेव्हा सुरू होती, तेव्हाच गॅस पाइपलाइनचे काम करणे आवश्यक होते. मात्र, आता हॉटिमिक्स केलेले रस्ते पुन्हा फोडल्यास शहराची दुर्दशा होईल. लोकांची गैरसोय होईल. पावसाळाही नजीक येत आहे. त्यामुळे आता रस्ते खुदाई योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title : रोहित मोन्सेरात विधानसभा चुनाव लड़ेंगे, महापौर कार्यकाल छोटा घोषित।

Web Summary : पार्षद रोहित मोन्सेरात आगामी विधानसभा चुनाव लड़ेंगे। उन्होंने महापौर पद के लिए उम्मीदवारी दाखिल की, जिससे संकेत मिलता है कि उनका कार्यकाल संक्षिप्त होगा। उनका लक्ष्य स्मार्ट सिटी बस सेवाओं का विस्तार करना और गैस पाइपलाइनों के लिए सड़क की खुदाई का विरोध करना है।

Web Title : Rohit Monserrate to contest assembly elections, declares mayoral term short.

Web Summary : Councilor Rohit Monserrate will contest the upcoming assembly elections. He filed his mayoral candidacy, indicating his term would be brief. He aims to expand Smart City bus services and opposes renewed road excavations for gas pipelines, citing inconvenience.