शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील मद्यसेवनाला विरोध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 20:12 IST

गोव्याच्या समुद्रकिना-यांवर मद्यसेवन करण्यास बंदी लागू करणा-या नियमाला पर्यटकांकडून विरोध झाला असला तरी स्थानिक समाज व पर्यटन क्षेत्राने त्या बंदीचे स्वागतच केले आहे.

- राजू नायकगोव्याच्या समुद्रकिना-यांवर मद्यसेवन करण्यास बंदी लागू करणा-या नियमाला पर्यटकांकडून विरोध झाला असला तरी स्थानिक समाज व पर्यटन क्षेत्राने त्या बंदीचे स्वागतच केले आहे.गेल्या आठवड्यात गोवा मंत्रिमंडळाने सुधारित पर्यटन व्यवसाय कायद्याला हिरवा कंदील दाखविला. या विधेयकाला गुरुवारी विधानसभेत मंजुरी मिळेल. त्यानुसार किना-यावर मद्यप्राशन करणे किंंवा स्वयंपाक करणे आता गुन्हा बनला असून त्यासाठी दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिने तुरुंगवास अशी शिक्षा आहे. गटांनी असे गुन्हे केल्यास त्यांचा दंड १० हजार रुपये असेल. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी व किनाºयांवरही धूम्रपान करण्यास बंदी आहे.पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी तसेच किनारपट्टीवर उपहारगृहे चालविणाºया व्यावसायिक गटाचे प्रमुख क्रूझ कार्दोज यांनी या बंदीचे जोरदारपणे स्वागत केले. गेल्याच आठवड्यात गोव्यात पर्यटक कमी येत असल्याबद्दल आजगावकर यांच्यावर पर्यटन व्यावसायिकांनी टीका केली होती.राज्याची खरी अडचण ही कमी आर्थिक गटातील पर्यटकांची गोव्यावर पडणारी टोळधाड. हे लोक रस्त्यावरच स्वयंपाक करतात. किनाºयांवर गटागटांनी मद्यप्राशन करतात. एवढेच नव्हे तर किना-यांवर उकिरडा करून इतर पर्यटकांची सतावणूकही करतात. विदेशी पर्यटकांची छेड काढण्याचे प्रकार तर गोव्यात सर्रास घडत असतात. त्याहून मोठी विकृती म्हणजे हे पर्यटक केवळ दारू पिऊन थांबत नाहीत तर किनाºयावर बाटल्या फोडतात त्या इतरांच्या पायाला लागण्याचा संभव असतो.किना-यांवर सकाळी व्यायाम करायला येणाºया गोवेकरांचे म्हणणे असते की वाळूत उघड्या पायांनी चालणे चांगले मानले जाते. परंतु, आम्हाला सारखी भीती असते, तळव्यांना काचा लागतील. कारण, तेथेच बाटल्या फोडलेल्या आम्हाला सर्रास दिसतात.पर्यटकांनी किना-यांवर उच्छाद मांडला असल्याबद्दल एकूणच गोवेकरांचे एकमत आहे. पूर्वी गोवेकर किना-यांवर मोकळ्या हवेसाठी, ताजेतवाने होण्यासाठी जात असत. संध्याकाळी किना-यावर भटकणे हा एक निवांतपणाचा, विरंगुळ्याचा भाग होता. परंतु, हल्ली गोवेकरांनी ते सोडून दिले आहे. कारण, किनाºयांवर पर्यटकांची अलोट गर्दी असते आणि एकच कोलाहल निर्माण झालेला असतो. शिवाय काही किनाºयांवर प्लास्टिक कचरा व इतर टाकाऊ वस्तू फेकल्या असल्यामुळे ते उकिरडे बनले आहेत.मद्यप्राशनास बंदीच्या निर्णयामुळे पर्यटक मात्र खट्टू झालेले आहेत. त्यांच्या मते, गोव्यात तरुण येतात ते मौजमजेसाठीच. तशीच गोव्याची प्रतिमा आहे. येथे स्वस्त दारू मिळते. पाश्चात्य देशांमध्ये रस्त्यावरही दारू पिण्यास मुभा असते. परंतु, किनाºयांवर बाटल्या मात्र टाकू नयेत. अशा बंदीमुळे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील असा इशारा ते देतात. परंतु, असा दृष्टिकोन बाळगणारे पर्यटक विसरतात की गोव्याच्या बहुसंख्य किना-यांवर खानपानगृहे -ज्यांना शॅक्स म्हटले जाते- मोठ्या संख्येने आहेत आणि तेथे मद्य पुरविले जाते.नाक्यानाक्यावर हॉटेलांची रेलचेल आहे. तेथे जाऊन पिण्याची मुभा असताना पर्यटकांनी किना-यांवरच जाऊन जाहीरपणे पिण्याचा अट्टहास का बाळगावा? गोव्यात ‘बार’ची संख्या ७२०० असून दरवर्षी नवे १०० परवाने देतात, त्या विरोधात महिला संघटनांनी यापूर्वीच आवाज उठविला आहे.

टॅग्स :goaगोवा