लोकसभेसाठी भाजपचा दक्षिणेत कोण? दोन दिवसात गुंता सुटणार

By वासुदेव.पागी | Published: March 2, 2024 04:36 PM2024-03-02T16:36:04+5:302024-03-02T16:36:34+5:30

दोन दिवसांनी याचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. 

Who is BJP in South: The tangle will be resolved in two days | लोकसभेसाठी भाजपचा दक्षिणेत कोण? दोन दिवसात गुंता सुटणार

लोकसभेसाठी भाजपचा दक्षिणेत कोण? दोन दिवसात गुंता सुटणार

पणजी - भारतीय जनता पक्षाने यावेळी दक्षीण गोव्यातील जागा जिंकणे ही किती प्रतिष्ठेची बाब बनविली आहे हे उमेदवार निवडणुकीत घेतल्या जात असलेल्या सावधगिरीमुळे स्पष्ट होत आहे. दक्षीण गोव्यात उमेदवार म्ङणून नरेंद्र सावईकर यांनाच पुन्हा संधी दिली जाणार की माजी मंत्री बाबू कवळेकर यांना उमेदवाली दिली जाणार याबाबत अजून ठऱलेले नाही. मात्र दोन दिवसांनी याचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. 

दक्षिण गोव्यातून भाजपचे उमेदवार म्हणून चार नावे चर्चेत होती. त्यात नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, दामू नाईक आणि विद्यमान सभापती रमेश तवडकर ही नावे आहेत. मात्र तवडकर लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सूक नसल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले आहे. तसेच दामू नाईक यांचे नावही मागे पडले आहे. बाबू कवळेकर की नरेंद्र सावईकर यावर कायते शिक्कामोर्तब होणार आहे. दोघांनाही हायकमांडने दिल्लीत बोलावून घेतले होते. मात्र शुक्रवारी उशिरापर्यंत काहीच निर्णय झाला नव्हता. शनिवारी सकाळी भाजप मुख्यालयात संकल्पपत्र रथयात्रेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांना दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवारा विषयी विचारले असता यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोन दिवसात उमेदवाराची नावे जाहीर केली जातील असेही ते म्हणाले. उमेदवार कुणीही असले तरी दोन्ही मतदारसंघात भाजपच जिंकणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

उत्तर गोवा मतदारसंघासाठी श्रीपाद नाईक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार हे निश्चित झाले आहे. दक्षिण गोव्यात उमेदवार कोण हे ठरल्यानंतर दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची नावे एकाचवेळी जाहीर केली जाणार आहेत अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Web Title: Who is BJP in South: The tangle will be resolved in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.