भाजपमुळे कल्याणकारी योजना: दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:49 IST2025-06-05T07:48:59+5:302025-06-05T07:49:25+5:30

नुवेतील पक्ष मेळाव्याला प्रतिसाद 

welfare schemes due to bjp said damu naik | भाजपमुळे कल्याणकारी योजना: दामू नाईक

भाजपमुळे कल्याणकारी योजना: दामू नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात कल्याणकारी योजना सुरू केल्या गेल्या. देश स्वतंत्र होऊन ६५ वर्षे झाली तरी देशातील महिलांसाठी शौचालय उभारण्याचा विचार केला गेला नव्हता, तो देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर केला. आज महिलांना सुरक्षा मिळाली आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. नुवे मतदारसंघात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, दक्षिण गोवा जिल्हा भाजपाध्यक्ष प्रभाकर गावकर, प्रभारी सर्वानंद भगत, गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँतोनी बार्बोझा, नुवे भाजपा मंडळ अध्यक्ष मनेष वेर्लेकर उपस्थित होते.

नुवे भाजपा मंडळाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तर नाईक यांनी नुवे भाजपा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बोरकर यांनी केले. मेळाव्याला लोकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: welfare schemes due to bjp said damu naik