शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांचे किरणपाणी येथे स्वागत

By admin | Updated: November 24, 2014 01:28 IST

पेडणे : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी किरणपाणी पुलावर गोव्यातील शिवसैनिकांनी भव्य स्वागत केले.

पेडणे : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी किरणपाणी पुलावर गोव्यातील शिवसैनिकांनी भव्य स्वागत केले. गोवा शिवसेना राज्य प्रमुख रमेश नाईक यांनी त्यांना पुष्पहार घातला. या वेळी ठाकरेंसह त्यांच्या पत्नी, सुपुत्र तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत सामील होणार का? असा प्रश्न केला असता ते फक्त हसले. मात्र, त्यांनी उत्तर देणं टाळलं. तसेच गोव्याबाबत ते म्हणाले, ज्या कोकणाने भरभरून माझ्यावर प्रेम केले, त्याचाच गोवा एक भाग आहे. त्यातच महाराष्ट्रात व गोव्यात भाजपासारख्या समविचारी पक्षाचे सरकार असल्याने ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ याची प्रचीती येईलच, असे ते म्हणाले. शनिवार व रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या ठाकरे कुटुंबीयांनी आरोंदा येथील देवी भद्रकालीचे दर्शन घेतल्यानंतर मुंबईकडे रवाना होताना किरणपाणी पुलावर थांबलेल्या शिवसैनिकांकडून स्वागत स्वीकारले. ठाकरे कुटुंबीय किरणपाणी येथे आल्यानंतर केवळ गाडीतून उतरून त्यांनी गोवा शिवसेना प्रमुखांकडून पुष्पहार स्वीकारून दाबोळीकडे रवाना झाले. या वेळी गोवा शिवसेना संपर्क प्रमुख शशिकांत पर्येकर, दक्षिण गोवा संपर्क प्रमुख धनराज नाईक, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख प्रसाद दळवी, केपे तालुका शिवसेना प्रमुख संदीप शिरवईकर, बार्देस तालुका प्रमुख राजेश पाटील, सांगे तालुका प्रमुख इनेश कासार्डेकर, म्हापसा शहर प्रमुख नरेंद्र मोरजकर, सांगे शहर प्रमुख शैलेश नाईक, मांद्रे शाखा प्रमुख रसिक म्हामल, संतोष कापडी, दिनेश गावकर, अ‍ॅड. नामदेव चोडणकर, अ‍ॅड. कृष्णा नाईक, केरीचे पंच आनंद शिरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, आरोंदा जेटीमुळे इथल्या रेती व्यवसायावर गंडांतर येणार असल्याने या जेटीला आमचा विरोध असल्याचे पालयेचे सरपंच बाबनी आरोलकर व तुळशीदास गवंडी यांनी गोवा शिवसेना प्रमुख रमेश नाईक यांना सांगितले. आपली बाजू शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्याची मागणी या वेळी केली असता नाईक यांनी सांगितले, की गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी आपल्या भागाचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत व महाराष्ट्रात तसेच देशात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आपण हा प्रश्न गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू. (प्रतिनिधी)