शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विनोद देसाई माझा कर्मचारी कधीच नव्हता, फसवणूक प्रकरणात आयुष मंत्र्यांची साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 6:09 PM

संशयित विनोद देसाई हा माझा शेजारी आहे, परंतु तो केव्हाच माझा कर्मचारी नव्हता अशी साक्ष केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात बुधवारी  नोंदविली.

पणजी - संशयित विनोद देसाई हा माझा शेजारी आहे, परंतु तो केव्हाच माझा कर्मचारी नव्हता अशी साक्ष केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात बुधवारी  नोंदविली.  देसाई नामक युवकाने नोकरी देण्याचे आमिष सांगून तसेच मंत्र्यांचा कर्मचारी असल्याचे सांगून लोकांकडून पैसे घेवून त्यांची फसवणूक केली असल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदविला आहे आणि या प्रकरणात मंत्र्यांची ही साक्ष होती. विनोद देसाई याने मंत्र्यांच्या वशिल्याने नोकरी देण्याचे आश्वासन देऊन २ लाख रुपये घेतल्याची तक्रार मेरशी येथील एक युवक मर्विन फर्नांडीस यांनी केली होती.  नाईक यांना या प्रकरणात  साक्षीदार बनविले होते. त्यामुळे त्यांना साक्ष नोंदविण्याचा अदेश न्यायालयाने दिला होता. मागील आठवड्यात ही साक्ष नोंदली जाणार होती,  परंतु काही कामामुळे त्या दिवशी न्यायालात उपस्थित राहू शकत नसल्यामुळे न्यायालयाकडे मंत्र्यांनी मूदत मागितली होती. न्यायालयाने नंतर १२ जून ही तारीख दिली होती. त्यानुसार मंत्री नाईक हे बुधवारी सकाळी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहिले.  संशयित विनोद देसाईशी आपला काहीच संबंध नसल्याचे मंत्र्यांने आपल्या साक्षीत म्हटले आहे. तसेच तो आपला कर्मचारी कधीच नव्हता असेही म्हटले आहे. संशयित  कधी आपले नाव सांगून, कधी मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून तर कधी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ््येकर यांचे नाव सांगून असे प्रकार करीत होता असे आता ऐकू येत असल्याचे त्यांनी न्यायालयातून बाहेर पडताना माध्यमाशी बोलताना सांगितले. अ‍ॅड आयरीश रॉड्रीगीश यांनी यात विनाकारण आपले नाव गोवले व तो आपला कर्मचारी असल्याचे सांगून आपली बदनामी केल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.विनोद देसाई हा नाईक यांचा कर्मचारी असल्याचे आणखी एका साक्षिदाराने म्हटले आहे व तशी साक्ष नोंदविली असल्याची माहिती अ‍ॅड आयरीश रॉड्रिगीश यांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवा