शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बोरीत खड्ड्याने घेतला महिलेचा बळी

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

फोंडा : बोरी पुलाजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी एका महिलेला जीव गमवावा लागला. चुलत दीराच्या दुचाकीवरून कामावर जाताना खड्डे चुकविण्याच्या

फोंडा : बोरी पुलाजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी एका महिलेला जीव गमवावा लागला. चुलत दीराच्या दुचाकीवरून कामावर जाताना खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मंजुळा प्रमोद नाईक (वय २७, रा. वाजे-शिरोडा) हीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक रोहित रंगनाथ शिरोडकर किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. मंजुळा ही कोलवा येथील एका हॉटेलात स्वागतिका म्हणून कामाला होती. वेर्णा येथे कामाला जाणाऱ्या चुलत दीरासोबत ती शिरोड्याहून बोरी पुलापर्यंत दुचाकीवरून (क्र. जीए 0५ ए ८१८६) येत असे. तेथून बसमधून ती मडगावला जात होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दोघेही दुचाकीवरून पुलाजवळील रस्त्यावरून जात होती. खड्डे चुकवण्याच्या नादात रोहित यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून जाऊ पाहाणाऱ्या ट्रकने (क्र. एपी २३ वाय ४५२९) धडक दिल्याने मंजुळा रस्त्यावर पडली व ट्रकचे पुढचे चाक तिच्या अंगावरून गेल्यामुळे जागीच गतप्राण झाली. फोंड्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन गावडे यांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. ट्रकचालक पसार झाल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी क्लिनरला ताब्यात घेतले. मात्र, त्याला मल्ल्याळीशिवाय कोणतीही भाषा अवगत नसल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे. मंजुळा हिचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिच्या पश्चात पती, सासू, सासरे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)