शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीयांसोबत चित्रपट करणार; अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:35 IST

नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्यावतीने कांपाल येथे बुक फेस्टिव्हलमध्ये सचिन पिळगावकर बोलत होते.

नारायण गावस, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मला जरी कोंकणी भाषा येत नसली तरी माझी मातृभाषा कोंकणीच आहे. पण कोकणी शिकायला आवडेल. कोंकणी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. गोमंतकीय कलाकारांना घेऊन सपत्नीक चित्रपट तयार करण्याचा माझा विचार आहे,' असे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी रविवारी सांगतिले. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्यावतीने कांपाल येथे बुक फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते.

सचिन पिळगावकर म्हणाले, 'आमच्या पाच पिढ्या मुंबईत गेल्या. त्यामुळे कोणी कोंकणी बोलत नाही. त्यामुळे मला कोंकणी येत नाही; पण आता भाषा शिकण्याचा विचार आहे. कोंकणी चित्रपट निर्मितीचाही विचार आहे.

पुस्तक लेखनाचा विचार

अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, 'माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला २०१३ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मी माझे आत्मकथन हे पुस्तक लिहिले. यातून करिअरमधील विविध घटनांचा उलगडा झाला. आता 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला. हा मराठी चित्रपट कसा बनवला, या विषयावर एक पुस्तक लिहिण्याचा विचार आहे. ते लवकर पूर्ण केले जाणार आहे. गणपतीपुळेच्या (रत्नागिरी) आशीर्वादाने हा चित्रपट कसा बनला हा विषय यात असेल.

वेळेचे महत्त्व

सचिन पिळगावकर म्हणाले की, 'मी अजून वयस्क दिसत नाही, हा मला आईचा लाभलेला आशीर्वाद आहे. मी सर्व काही खातो; पण मर्यादित. मनावर ताण घेत नाही. जास्त विचार करत नाही. वेळेचे महत्त्व पाळतो. मला लहानपणी इंग्रजी भाषा येतच नव्हती; पण अनुभवातून शिकलो. पत्नी सुप्रिया पिळगावकर, माझे मित्र अभिनेते अशोक सराफ यांची खुप मदत झाली.

पिळगावकर म्हणाले की, 'लवकरच आमच्या मूळ गावी म्हणजे पिळगाव येथे घर बांधण्याची इच्छा आहे. या गोष्टी लवकरच पूर्ण केल्या जातील. माझे नाते हे गोव्याशी जोडलेले आहे.' 

पिळगावकर म्हणाले, 'लहानपणापासून अभिनय क्षेत्रात असल्याने हिंदी, मराठी असे अनेक चित्रपट केले. माझा पहिला खूप गाजलेला चित्रपट म्हणजे 'गीत गाता चल' खूप गाजला. त्यामुळे अनेकांना मी अजून उत्तर भारतीय वाटतो. अनेकजण मला मुंबईचा, मराठी माणूस समजत नाहीत. या चित्रपटात मला खूप काही शिकवले. बाल कलाकार म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. नंतर असे अनेक चित्रपट करत गेलो. 'शोले'सारख्या चित्रपटातही मला संधी मिळाली. हा चित्रपट म्हणजे एक प्रकारची क्रांती आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sachin Pilgaonkar desires to create a film with Goan artists.

Web Summary : Actor Sachin Pilgaonkar, despite not knowing Konkani, expressed his desire to learn the language and create a film with Goan artists. He also plans to write a book about making his film 'Navra Mazha Navsacha 2' and intends to build a house in his ancestral village.
टॅग्स :goaगोवाSachin Pilgaonkarसचिन पिळगांवकरcinemaसिनेमाMarathi Actorमराठी अभिनेता