शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

माविनवर कारवाईप्रश्नी दोन दिवसांत निर्णय

By admin | Updated: February 21, 2015 02:19 IST

मडगाव : दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावर आता काँग्रेस पक्षातर्फे कारवाई अटळ आहे. गुदिन्हो यांच्या पक्षविरोधी कारवाया वाढल्या असून,

मडगाव : दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावर आता काँग्रेस पक्षातर्फे कारवाई अटळ आहे. गुदिन्हो यांच्या पक्षविरोधी कारवाया वाढल्या असून, त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत व त्यानंतर कुठल्याही क्षणी प्रदेश काँग्रेस समिती त्याबाबत निर्णय घेऊन तो पुढील सोपस्कारासाठी हायकमांडकडे पाठवून देणार आहे. काल मडगावात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुदिन्हो यांच्यावरील कारवाईबद्दल सुतोवाच केले. एका कार्यक्रमात गुदिन्हो यांनी आपला पाठिंबा भाजपाला असल्याचे सांगितल्याचे वृत्त दूरचित्रवाणीवरून बघितले. दाबोळीतून ते स्वबळावर निवडून आले नव्हते तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना मते दिली होती. जिंकून आल्यानंतर आतापर्यंत गुदिन्हो हे भाजपाशी जवळीक साधून आहेत. त्यामागील गुपितही उघड आहे. वीज घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुध्द सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून आपली कातडी वाचविण्यासाठी गुदिन्हो हे स्वार्थी राजकारण खेळत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस ज्यो डायस तसेच दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मिनिनो फर्नांडिस यांनी संयुक्तपणे केला. एकेकाळी राजीव गांधी हे आपले राजकीय गुरू असल्याचे गुदिन्हो सांगत होते; आज मात्र ते या पक्षाशी फटकून वागत आहे. काँग्रेसमध्ये राहायचे नसेल तर खुशाल जा, असे या दोघांनी त्यांना बजावले आहे. मोन्सेरात यांनी उघड उघड पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून काढण्यासंबंधी निणर्य घेण्यात आला असून, लवकरच त्याची कार्यवाही होईल. मात्र, माविन गुदिन्हो यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली नव्हती, त्यामुळे कारवाईला थोडा वेळ लागला, असे फर्नांडिस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)