शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपासून वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर्स’

By admin | Updated: April 23, 2016 02:28 IST

पणजी : राज्यातील विविध प्रकारच्या वाहनांना येत्या जुलैपासून स्पीड गव्हर्नर्स लावणे सक्तीचे असेल. तशा प्रकारचा आदेश

पणजी : राज्यातील विविध प्रकारच्या वाहनांना येत्या जुलैपासून स्पीड गव्हर्नर्स लावणे सक्तीचे असेल. तशा प्रकारचा आदेश केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केला आहे. हा आदेश देशभरातील वाहनांना लागू होत आहे. यापूर्वी एप्रिल-मे पासून या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक होते. तथापि, आता नव्या आदेशाद्वारे जुलैपासून कार्यवाही सक्तीची आहे. बसगाड्या, ट्रक, कारगाड्या, जीप, पिकअप अशा विविध वाहनांसाठी स्पीड गव्हर्नर्स लागू होईल. आॅक्टोबर २०१५ नंतर ज्या वाहनांची निर्मिती झाली, त्यांच्यासाठीच स्पीड गव्हर्नर्स सक्तीचा आहे. केंद्र सरकारने देशभर याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. वाहन अपघात रोखणे व अन्य हेतू यामागे आहेत. स्पीड गव्हर्नर्सद्वारे कमाल वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटर एवढी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जुलैनंतर ज्या वेळी वाहने तपासणीसाठी येतील, त्या वेळी संबंधित यंत्रणेकडून त्या वाहनास स्पीड गव्हर्नर्स आहे की नाही, हे पाहिले जाईल, असे वाहतूक खात्याचे संचालक सुनील मसुरकर यांनी शुक्रवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, अनेक बस व्यावसायिकांचा या पद्धतीस विरोध आहे. गेली काही वर्षे सरकार स्पीड गव्हर्नर्स लागू करण्याचे आदेश जारी करून मग मुदतवाढही देत आहे. वाहनांना स्पीड गव्हर्नर्स बसविण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्याखालील नियमही दुरुस्त केले आहेत. शुक्रवारी राज्य सरकारच्या राजपत्रात हे नियम प्रसिद्ध झाले आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या वाहनांना स्पीड गव्हर्नर्सच्या सक्तीमधून वगळण्यात आले आहे. (खास प्रतिनिधी)