'वंदे मातरम्' स्फूर्तीदायी राष्ट्रीयगीत: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:12 IST2026-01-28T07:11:49+5:302026-01-28T07:12:46+5:30
संकल्प आमोणकर यांच्या कार्यालयाजवळ प्रजासत्ताक दिन सोहळा

'वंदे मातरम्' स्फूर्तीदायी राष्ट्रीयगीत: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : वंदे मातरम् चैतन्य, स्फूर्ती देणारे राष्ट्रीयगीत आहे. भारतीय संविधान अंमलात आल्याचा दिवस ऐतिहासिक आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित होत असून, गोवादेखील विकासकामात भरारीने पुढे जात असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक मुरगाव येथे केले.
मुरगाव-सडा येथे आमदार संकल्प आमोणकर यांच्या कार्यालयाजवळ प्रजासत्ताकदिनी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार आमोणकर, मुरगाव नगरसेविका श्रद्धा आमोणकर, बायणा रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभूदेसाय, सदस्य सदानंद घोणसेकर, मुरगाव भाजप मंडळ अध्यक्ष अॅड. अविनाश नाईक, मुरगाव भाजप प्रभारी संतोष केरकर, शांताराम पराडकर, योगेश पाटील, जगदीश गवंडी, सुशांत नाईक, प्रसाद प्रभूगावकर उपस्थित होते.
मतदार यादीतून मृतांची नावे वगळावी
राज्य निवडणूक आयोगाने सर्वत्र विशेष गहन पुनरावृत्ती (एसआयआर) सुरू केली असून, मृत व्यक्तीची नावे गेली २० ते २५ वर्षे न वगळल्याने मतदारसंख्या वाढली होती. राज्यात जेव्हा एकदा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा मृत्यू प्रशस्तीपत्र पालिका किंवा पंचायतीत नोंद होते. मृत व्यक्तीचे नाव त्वरित जन्म-मृत्यू कार्यालयात जाते. तेव्हाच त्याची माहिती निवडणूक आयोगात होणे आवश्यक आहे. याविषयी विधानसभेत शून्य तासात बोललो होतो, यांची अंमलबजावणी संबंधित विभागाने त्वरित करावी, अशी मागणी आमदार आमोणकर यांनी केली आहे.