केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ५ तारखेला गोवा भेटीवर

By किशोर कुबल | Published: March 1, 2024 06:49 PM2024-03-01T18:49:13+5:302024-03-01T18:50:05+5:30

नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.

Union Defense Minister Rajnath Singh to visit Goa on 5th | केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ५ तारखेला गोवा भेटीवर

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ५ तारखेला गोवा भेटीवर

पणजी: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ५ रोजी गोवा भेटीवर येत असून वेरें येथे आयएनएस मांडवी नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. या इमारतीमुळे संस्थेला लष्करी सेवेतील अधिका-यांना सध्याच्या क्षमतेच्या तिप्पट संख्येने प्रशिक्षित करता येईल. चोल वंशाच्या पराक्रमी सागरी साम्राज्याच्या स्मरणार्थ या इमारतीला ‘चोल’ असे नाव देण्यात आले आहे. उद्घाटनाला नेव्हल वॉर कॉलेजच्या माजी कमांडंटसह वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

भारतीय नौदलातील मधल्या स्तरावरील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रगत व्यावसायिक लष्करी शिक्षण देण्यासाठी मुंबईत १९८८ मध्ये ‘आयएनएस कारंजा’ येथे नौदल युद्ध महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. २०१० साली महाविद्यालयाचे नाव बदलून नेव्हल वॉर कॉलेज असे करण्यात आले आणि २०११ साली ते गोव्यातील सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

Web Title: Union Defense Minister Rajnath Singh to visit Goa on 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.