Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 23:09 IST2025-10-17T23:06:25+5:302025-10-17T23:09:19+5:30
Goa Cylinder Explosion: दक्षिण गोव्यातील लोटलीम येथील विजय मरीन परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला.

Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
दक्षिण गोव्यातील लोटलीम येथील विजय मरीन परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
A cylinder blast at Vijay Marine in Lotlim, South Goa, killed 2 people and injured 5 others, with 4 seriously hurt. The injured were taken to Goa Medical College and Margao District Hospital. Police, fire brigade, and bomb squad have sealed the area, and an investigation is… pic.twitter.com/CMD73tCxgT
— IANS (@ians_india) October 17, 2025
दक्षिण गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटलीम येथील विजय मरीन परिसरात आज सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि मडगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल, अग्निशमन दल आणि बॉम्ब पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. स्फोटाचे नेमके कारण आणि पुढील तपास बॉम्ब पथक व स्थानिक पोलीस करत आहेत.