शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत विनातिकीट प्रवास; वर्षभरात २० कोटींचा दंड; कोकण रेल्वेची ३ लाख ६८ प्रवाशांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:25 IST

प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने रेल्वेने वर्षभर तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कोकणरेल्वे मार्गावर विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. २०२५ या वर्षभरात तब्बल ३,६८,९०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २०.२७ कोटी रुपयांचा महसूल दंडाच्या स्वरूपात गोळा करण्यात आला आहे.

केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात ९९८ विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. त्या दरम्यानस विनातिकट प्रवास करणाऱ्या ४३,८९६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.४५ कोटी रुपयांचा दंड आणि थकीत रेल्वे भाडे वसूल करण्यात आले आहे.

प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने रेल्वेने वर्षभर तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. २०२५ या संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास ही आकडेवारी थक्क करणारी आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८,४८१ विशेष मोहिमा राबवण्यात आल्या.ही कारवाई रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आणि स्थानकांवर करण्यात आली. भविष्यातही अशा मोहिमा अधिक तीव्र केल्या जातील, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, कायदेशीर कारवाई आणि गैरसोय टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan Railway Fines Ticketless Travelers ₹20 Crore in One Year.

Web Summary : Konkan Railway penalized 3,68,901 ticketless travelers, collecting ₹20.27 crore in fines during 2025. Intensive checks, including 998 special drives in December alone, recovered ₹2.45 crore. The railway urges passengers to travel with valid tickets to avoid penalties.
टॅग्स :goaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणrailwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स