शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मगोचे तिन्ही आमदार जनतेसोबत

By admin | Updated: November 29, 2014 01:00 IST

फोंडा : सध्या कूळ-मुंडकार प्रश्नी विविध माध्यमांतून जनतेची दिशाभूल केली जात असून मगो पक्षाचे तीनही आमदार जनतेबरोबर राहणार आहेत.

फोंडा : सध्या कूळ-मुंडकार प्रश्नी विविध माध्यमांतून जनतेची दिशाभूल केली जात असून मगो पक्षाचे तीनही आमदार जनतेबरोबर राहणार आहेत. कूळ-मुंडकार प्रश्नी कोणालाही मदतीची गरज भासल्यास मगो पक्ष सदैव तत्पर राहाणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यात केले. फोंडा व्यापारी संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित व्यापाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार लवू मामलेदार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर मामलेकर, समाजसेविका अ‍ॅड. स्वाती केरकर, सीटूचे अ‍ॅड. थालमन परेरा, अ‍ॅड. जतीन नाईक, कुर्टी-खांडेपारचे पंच नरेंद्र परब, पीपल आॅफ फोंडाचे मनोज गावकर, नगरसेविका निधी मामलेकर, विद्या पुनाळेकर आणि घारू सावंत उपस्थित होते. व्यापारी संघटनेतर्फे आयोजित व्यापाऱ्यांचा सत्कार सोहळा हा योग्य व्यक्तींचा सत्कार असून स्वत:चा संसार चालवतानाच दुसऱ्याला मदत करण्याचे औदार्य या व्यापाऱ्यांत दिसून येते. व्यापाऱ्यांच्या आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची येथील भाजपा कार्यकर्त्यांनी दिशाभूल केली. अन्यथा आज व्यापाऱ्यांची समस्या सुटली असती, असे ढवळीकर पुढे म्हणाले. व्यापारी संघटना कशी असावी, हे फोंड्यातील व्यापाऱ्यांनी दाखवून दिले असून संघटना बळकट करायची असल्यास राजकारण्यांना चार हात दूर ठेवण्याचे आवाहनही ढवळीकर यांनी केले. तसेच संघटनेचे कार्य पुढे चालू राहावे यासाठी आपले, तसेच आपले बंधू दीपक ढवळीकर आणि आमदार लवू मामलेदार, असे तिघांचेही दोन महिन्यांचे वेतन संघटनेला देण्याचे जाहीर केले. या वेळी सुदिन ढवळीकर आणि आमदार लवू मामलेदार यांच्या हस्ते दादू रामचंद्र नाईक, प्रेमा विष्णू नाईक, सोनू गावडे, सुश्मिता नाईक, रामा परब, काशिनाथ येडवी, हबीबा शेख, पास्किन फर्नांडिस, पार्वती गाड, एकनाथ एकावडे, सरस्वती नाईक, जुझे वाझ आणि सुशिला नाईक या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य व्यापाऱ्यांना ओळखपत्रे वितरित करण्यात आली. या वेळी अ‍ॅड. स्वाती केरकर, अ‍ॅड. थालमन परेरा, अ‍ॅड. जतीन नाईक, नरेंद्र परब, किशोर मामलेकर, मनोज गावकर यांनीही आपले विचार मांडले. सुरुवातीला संघटनेचे सचिव महेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. घारू सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन दामोदर नाईक यांनी केले, तर घारू सावंत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)