तेरा दिवसानंतर त्याने मरणापुढे हात टेकले; मोले अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरचे निधन
By आप्पा बुवा | Updated: June 18, 2023 18:48 IST2023-06-18T18:48:22+5:302023-06-18T18:48:44+5:30
इनोवा कार व अल्टो कार दरम्यान भिषण अपघात झाला होता.

तेरा दिवसानंतर त्याने मरणापुढे हात टेकले; मोले अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरचे निधन
फोंडा (गोवा) : दिनांक चार जून रोजी सुकतळी मोले येथे अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरचे परवा रात्री उशिरा निधन झाले असून, 13 दिवस जीवन मरणाच्या लढाईत शेवटी त्याने हार पत्करली. सविस्तर वृत्तानुसार चार जून रोजी सकाळी अकराच्या दरम्यान इनोवा कार व अल्टो कार दरम्यान भिषण अपघात झाला होता.
इनोव्हा कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येऊन अल्टोला धडक दिली होती. सदर अपघातात ड्रायव्हर ज्युलियो रेवारिडो (राहणार पणजी) व नरून निसा( छत्तीसगड) हे जखमी झाले होते. दोन्ही जखमीवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू होते. त्यांपैकी ज्युलीयो रेवारीडो याचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. शनिवारी त्याचे शवविच्छेदन झाले असून त्याचे पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.