शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुरगावमध्ये कोळसा समस्या आहेच : माविन यांनी दिली उपाययोजना करण्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 6:27 PM

मुरगाव तालुक्यात कोळशाची समस्या आहेच. लोकांनी आम्हाला त्याविषयी सांगितले आहे. प्रदुषणाविरुद्ध कडक उपाययोजना प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार करील, असे भाजपचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

पणजी : मुरगाव तालुक्यात कोळशाची समस्या आहेच. लोकांनी आम्हाला त्याविषयी सांगितले आहे. प्रदुषणाविरुद्ध कडक उपाययोजना प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार करील, असे भाजपचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यावेळी माविन यांच्या बाजूला बसले होते. मुरगावमध्ये कोळसा प्रदुषणाचा प्रश्न आहे काय असे पत्रकारांनी विचारताच गुदिन्हो म्हणाले, की निश्चितच आहे. लोकांना प्रदूषण बंद झालेले हवे आणि आमचे सरकार कडक उपाययोजना करण्यास संबंधित कंपन्यांना भाग पाडेल. मोठा डोम बांधून प्रदूषण रोखता येते. कितीही वारे आले तरी, मग प्रदूषण होत नाही.

माविन म्हणाले, की सरकार उपाययोजना करील असा वास्कोतील व मुरगाव तालुक्यातील लोकांना विश्वास आहे. लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. एमपीटीमध्ये मालाची हाताळणी पूर्ण बंद करावी अशी लोकांची मागणी नाही. माल हाताळणी सुरूच रहायला हवी पण प्रदूषण तेवढे बंद व्हायला हवे. काहीवेळा रस्त्याच्या बाजूला जी भुकूटी पडलेली असते ती देखील वारा आल्याबरोबर हवेत उडते व प्रदूषण होते.

खडपकर भाजपमध्ये दरम्यान, माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी त्यांच्या अनेक पाठीराख्यांसह शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन खडपकर यांचे पक्षात स्वागत केले. खडपकर हे 1993 सालापासून भाजपमध्ये होते. मध्यंतरी ते भाजपपासून वेगळे झाले होते. त्यांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आहेत. शिमगोत्सव समितीचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. आता दुस:यांदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आपण भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत झोकून देऊन काम करीन, असे खडपकर यांनी सांगितले. गुदिन्हो यांनी आपल्याला कायम पाठींबा व प्रोत्साहन दिले असे खडपकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा