रेस्टॉरंट जाहिरातीचा फुगा फुटला; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 15:15 IST2024-01-06T15:14:42+5:302024-01-06T15:15:28+5:30

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना सकाळी घडली.

The restaurant advertising baloon burst in hanjun mhapusa goa; Three injured | रेस्टॉरंट जाहिरातीचा फुगा फुटला; तिघे जखमी

रेस्टॉरंट जाहिरातीचा फुगा फुटला; तिघे जखमी

-काशिराम म्हांबरे 
म्हापसा: हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत वोझरान-वागातोर येथील किनारी भागात  डुबकी रेस्टॉरंटची जाहिरात करणारा हेलियमयुक्त मोठा फुगा फुटण्याचा प्रकार घडला आहे. त्यात तिघेजखमी होऊन त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात ( जीएमसी) दाखल करण्यात आले आहे.

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना सकाळी घडली. हा फुगा जाहिरात कंपनीचे कर्मचारी खाली उतरवत असताना अचानक फुटला.  त्यात हे कर्मचारी जखमी झाले. लागलीच त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जीएमसीत दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले.

कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या डुबकी रेस्टॉरंटच्या मालका विरोधात हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे.

Web Title: The restaurant advertising baloon burst in hanjun mhapusa goa; Three injured

टॅग्स :Accidentअपघात