पोलिसांशी भांडण करणाऱ्याला पाठविले मनोरुग्ण इस्पितळात

By वासुदेव.पागी | Updated: March 30, 2024 16:47 IST2024-03-30T16:46:19+5:302024-03-30T16:47:15+5:30

शुक्रवारी चिंबल येथे एक व्यक्ती पोलिसांबरोबर भांडत असल्याचा आणि झटापटीही करीत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

the person who fought with the police was sent to a psychiatric hospital in goa | पोलिसांशी भांडण करणाऱ्याला पाठविले मनोरुग्ण इस्पितळात

पोलिसांशी भांडण करणाऱ्याला पाठविले मनोरुग्ण इस्पितळात

वासुदेव पागी,पणजी: शुक्रवारी चिंबल येथे एक व्यक्ती पोलिसांबरोबर भांडत असल्याचा आणि झटापटीही करीत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल जुने गोवापोलिसांनी घेतली असून त्या गृहस्थाला बांबोळी येथील मानसोपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. 

ह्या गृहस्थाचे नाव सनी कुंडईकर असे असून त्याचे वय ४० वर्षे असून तो इंदिरानगर येथील रहिवासी आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल्य यांनी दिली. घरात त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते. तसेच कुटुंबाच्या इतर व्यक्तींशीही भांडण झाले होते.  त्याला ताब्यात घेऊन जुने गोवा पोलिसांनी चौकशी केली असता पोलिसांना त्याच्या या मानसिक आजाराविषयी समजले. पोलिसांनी त्याला बांबोळी येथील मानसोपचार केंद्रात दाखल केले आहे. 

व्हायरल व्हिडिओत हा इसम चिंबल येथे पोलिसांशी हुज्जत घालताना आणि नंतर हातापाई करतानाही दिसत आहे. हा प्रकार करण्यापूर्वी काही वेळापूर्वीच तो घरात भांडण करून आला होता अशी माहिती त्याच्या कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आली.

Web Title: the person who fought with the police was sent to a psychiatric hospital in goa