काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:52 IST2025-06-26T12:51:45+5:302025-06-26T12:52:19+5:30

पणजीत संविधान हत्या दिन

the book that congress leader rahul gandhi keeps is not of the constitution said cm pramod sawant | काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राहुल गांधी खिशात लाल पुस्तक घेऊन संविधान संविधान म्हणून सर्वांना दाखवित फिरताहेत, ते संविधानाचे पुस्तक नसून भलतेच कसले तरी पुस्तक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'संविधान हत्त्या दिन' कार्यक्रमात मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी जवळ बाळगणारे पुस्तक संविधानाचे पुस्तक नसल्याचा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे. त्यांन संविधानाची इतकीच पर्वा आहे तर त्यांनी त्यांच्या आजीने काय केले ते जाणून घ्यावे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, की आणीबाणीच्या अत्याचारातून गोवाही सुटला नाही. गोव्यातील पत्रकारांसह सर्वांनाच सरकारने लक्ष्य केले होते.

आणीबाणीचा तीव्र प्रतिकार

गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांनी या आणीबाणीचा तीव्र प्रतिकार केला. काँग्रेसने घडवून आणलेला अत्यंत अमानूष प्रकार म्हणजे नसबंदी मोहीम. संजय गांधी यांच्या सूचनावरून हा प्रकार घडवून आणला होता असे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अरुण सिंग, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: the book that congress leader rahul gandhi keeps is not of the constitution said cm pramod sawant