“रसिक प्रेक्षक हीच माझी संपत्ती, कितीही पैसा मिळाला, नाव मिळाले तरी...”: अलका कुबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:23 IST2026-02-11T11:23:46+5:302026-02-11T11:23:46+5:30

येडा खोतीगाव येथील आदी उत्सवाचे उदघाटन

the audience is my wealth said alka kubal in goa | “रसिक प्रेक्षक हीच माझी संपत्ती, कितीही पैसा मिळाला, नाव मिळाले तरी...”: अलका कुबल

“रसिक प्रेक्षक हीच माझी संपत्ती, कितीही पैसा मिळाला, नाव मिळाले तरी...”: अलका कुबल

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : कितीही पैसा मिळाला, नाव मिळाले तरी आपले पाय हे जमिनीवरच राहायला हवेत. 'माहेरची साडी' या सिनेमामुळे आपल्याला रसिक प्रेक्षकांचे पुष्कळ प्रेम मिळाले. रसिक प्रेक्षक हीच आपली मोठी शिदोरी असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री अलका कुबल यांनी केले.
येडा खोतीगाव येथील पार्वती परिवार व मोनो चेरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या आदी उत्सव २०२६चे उद्घाटन केल्यानंतर अलका कुबल बोलत होत्या.

यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नाट्य कलाकार भालचंद उसगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, गजानन गावकर, मनोज वेळीप, तोळू गावकर व इतर उपस्थित होते. यावेळी नाट्य कलाकार भालचंद्र उसगावकर, मिनाक्षी गावकर, जानू गावकर, प्रणाली गावकर, साहिल गावकर याचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह भेटवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिंदी गावकर यांनी केले.

संस्कृती टिकवण्याचे काम महिलांनी केले

ग्रामीण भागातील महिला सुद्धा आज कुठेच कमी पडत नसून आपली संस्कृती टिकविण्याचे काम महिलांनी केले आहे. आजच्या या आदी उत्सवात मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित राहिला व त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले ते कौतुकास्पद आहे. महिला वर्गाला प्रोत्साहित करण्यास पार्वती परिवाराचे अध्यक्ष दया उर्फ उमेश गावकर झटत असल्याने सांगत अलका कुबल यांनी दया गावकर यांचेसुद्धा अभिनंदन केले.

अफवांना भिक घालत नाही : गावकर

आदी उत्सवात १३० मंडळानी भाग घेतला असून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतानाच विविध क्रीडा प्रकार सुद्धा या आदी उत्सवात सादर करण्यात आले. सदर कार्यक्रम करताना कला व संस्कृती खात्याचे आर्थिक साहाय्य घेतले नाही. जनतेच्या सहकार्यानेच आजचा आदी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला असून जि.पं. निवडणुकीत आपल्याला अमुक पैसे दिले तमुक पैसे दिले असे जे आरोप केले जातात व आपल्यासंबधी समाजात अफवा पसरविल्या जातात. त्या अफवांना आपण भिक घालत नसल्याचे सांगून जनतेकरीता आपण कार्य करीत राहणार असे दया गावकर यांनी सांगितले.
 

Web Title : अलका कुबल: दर्शक प्रेम ही मेरी संपत्ति, पैसे से भी बढ़कर।

Web Summary : अभिनेत्री अलका कुबल ने विनम्रता और दर्शकों के प्यार के महत्व पर जोर दिया। उन्होंने आदि उत्सव 2026 का उद्घाटन किया, संस्कृति को संरक्षित करने के लिए महिलाओं और दया गावकर को उनके समर्थन के लिए सराहा। गावकर ने अफवाहों को खारिज किया और जनसेवा के प्रति अपनी प्रतिबद्धता की पुष्टि की।

Web Title : Alka Kubal: Audience's love is my wealth, more valuable than money.

Web Summary : Actress Alka Kubal emphasized humility and the importance of audience love. She inaugurated the Aadi Utsav 2026, praising women for preserving culture and Daya Gavkar for his support. Gavkar dismissed rumors and affirmed his commitment to public service.