भाजपाचे कार्य घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 08:03 IST2025-03-25T08:02:42+5:302025-03-25T08:03:28+5:30

साखळी भाजपा मंडळ समितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

take bjp work to every home said cm pramod sawant | भाजपाचे कार्य घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाजपाचे कार्य घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राज्य व केंद्राची योजना प्रत्येक घरात पोहोचवताना प्रत्येक कुटुंबात समृद्धी आणण्याचा संकल्प यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न करावे. साखळी मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांनी मंडळ समितीने घरोघरी कार्य पोहोचवणे गरजेचे आहे. नवे कार्यकर्ते जोडण्यासाठी कार्यरत राहावे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. साखळी मतदारसंघ अधिक सक्षम व आदर्श करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

भाजपा साखळी मतदारसंघ मंडळ समितीची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष हे उत्तर व भाजप अध्यक्ष दयानंद कार्बोटकर, मंडळ अध्यक्ष रामा नाईक, संजय नाईक, गोपाळ सुर्लीकर, कालिदास गावस व इतर मान्यवर उपस्थित होते.

संघटन कार्याचा आढावा

संजय नाईक यांनी साखळी मतदारसंघातील संघटन कामाचा आढावा घेतला. रामा नाईक यांनी मंडळ समितीची नावे जाहीर केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद चव्हाण यांनी मंडळ समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला.

संघटन कौशल्य हवे : कारबोटकर

दयानंद कारबोटकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी संघटन कौशल्य मजबूत करण्यावर भर द्यावा. आगामी निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कामाला लागावे.

भाजप मंडळ समिती :

अध्यक्ष : रामा नाईक, उपाध्यक्ष : नंदिनी गावस, चंद्रकांत घाडी, मनोहर वळवईकर, सरचिटणीस कालिदास गावस, गुरुप्रसाद नाईक, सचिव: मंदा गावडे, ईशा मापारी, सुंदर नाईक, खजिनदार: श्रीरंग सावळ. सदस्य : सुरेखा खोडगिनकर, साक्षी प्रियोळकर, सालिया गावस, हेमा पेटकर, सुविधा पेडणेकर, रुद्रेश कामत, सुनील मोरजकर, सुनील फाळकर, कृष्णा गावस, दशरथ मळीक, हरी मळीक, शांताराम वेरेकर, समीर धुमे, पांडुरंग गावस, रोहिदास मांद्रेकर, दत्तराज गावडे, उमेश सरनाईक, शिवनाथ गावस, आग्नेल डिसिल्वा, दिशा मयेकर, प्राची तारी यांची निवड करण्यात आली आहे
 

Web Title: take bjp work to every home said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.