शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त नेत्यांचे निलंबन चालूच राहील : जॉन

By admin | Updated: August 26, 2014 01:20 IST

पणजी : पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई चालूच राहणार असून आणखी काहीजणांचे निलंबन करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

पणजी : पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई चालूच राहणार असून आणखी काहीजणांचे निलंबन करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी म्हटले आहे. आपल्याविरुद्ध बातम्या पेरण्याचे काम हे पक्षातील भ्रष्ट माणसे करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी पणजी येथील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण पार पाडत असलेली जबाबदारी ही हायकमांडच्या सल्ल्यानेच आहे. त्यामुळे हायकमांडकडून आपल्यावर कारवाई करण्याची आणि आपल्याला पदच्युत करण्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ पेरलेल्या बातम्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. पक्षाचे प्रभारी दिग्विजय सिंग यांच्याशी आपण नित्य संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी हायकमांडने माझ्यावर सोपविली आहे आणि मी ती पार पाडत आहे, असे त्यांनी सांगितले. आलेक्स सिक्वेरा यांच्या निलंबनाबद्दल त्यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध आलेक्स रेजिनाल्ड यांनी तक्रार केली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात, म्हणजेच रेजिनाल्ड यांच्या विरोधात त्यांनी काम केले होते, अशा तक्रारी होत्या. या तक्रारीत तथ्यही आढळून आले आहे. त्यांच्याकडे या बाबतीत स्पष्टीकरणही मागितले होते. निलंबनाचा निर्णय हा सर्व सोपस्कार करूनच घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा पुतळा गोवा विधानसभा संकुलात उभारण्यात यावा आणि त्यासाठी सभापतीने संमती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (प्रतिनिधी)