शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

गोवा राजभवनविरुध्द राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 1:20 PM

गोवा राजभवनने आरटीआय अर्जाला माहिती न दिल्याने समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली आहे. राजभवनमधील सार्वजनिक माहिती अधिकारी तसेच राज्यपालांच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देगोवा राजभवनने आरटीआय अर्जाला माहिती न दिल्याने समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली आहे. राजभवनमधील सार्वजनिक माहिती अधिकारी तसेच राज्यपालांच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. आयरिश यांनी 19 ऑक्टोबरला राजभवनकडे अर्ज करुन तीन गोष्टींची माहिती मागितली होती.

पणजी - गोवा राजभवनने आरटीआय अर्जाला माहिती न दिल्याने समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली आहे. राजभवनमधील सार्वजनिक माहिती अधिकारी तसेच राज्यपालांच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

आयरिश यांनी 19 ऑक्टोबरला राजभवनकडे अर्ज करुन तीन गोष्टींची माहिती मागितली होती. 31 ऑगस्ट 2014 रोजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पदाचा ताबा घेतला त्या दिवसापासून आतापर्यंत राज्यपालांच्या दौऱ्यावर किती खर्च आला. वरील काळात किती महनीय आणि अतिमहनीय व्यक्तींनी राजभवनला भेट दिली. त्यांच्या पाहुणचारावर अर्थात निवास, भोजन आणि प्रवासावर किती खर्च झाला तसेच वरील कालावधीत राजभवनसाठी वाहन खरेदीवर किती खर्च करण्यात आले, अशी विचारणा त्यांनी अर्जातून केली होती. परंतु अर्ज करुन 30 दिवसांची मुदत उलटली तरी त्यांना माहिती देण्यात आलेली नाही. गोवा राजभवनकडूनच आरटीआय कायद्याचे उल्लंघन चालले आहे, असा आरोप आयरिश यांनी केला आहे. घटनेची पायमल्ली चालली आहे आणि हे हे अस्वीकारार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अशी आहे पार्श्वभूमी 

दरम्यान, तत्पूर्वी 15 ऑक्टोबर रोजी राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी राजभवनला सार्वजनिक माहिती अधिकारी नेमून आरटीआय कायद्याची अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला होता. आरटीआय कायद्याच्या कलम 4 (1) खाली अर्जदाराला माहितीही उपलब्ध करावी, असेही या आदेशात म्हटले होते. 

राजभवन माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचा राजभवनचा दावा होता. तर दुसरीकडे गोव्याच्या राजभवनकडून आरटीआय कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आयरिश यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे केली होती. आयरिश यांचा असा दावा होता की, आरटीआय कायद्याच्या कलम 2 (एच)अन्वये राजभवन ‘सार्वजनिक अधिकारिणी’ असूनही अद्याप तेथे सार्वजनिक माहिती अधिकारी नेमण्यात आलेला नाही. ही नियुक्ती न करणे कायद्याला धरुन नाही. देशभरातील सर्व राजभवनांमध्ये तसेच राष्ट्रपती भवनातही आरटीआय कायद्याची अंमलबजावणी केली जाते. 

मुख्य माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर आता तरी राजभवनमध्ये आरटीआय कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे का, याची शहानिशा करण्यासाठी आयरिश यांनी वरील आरटीआय अर्ज सादर केला होता. 

टॅग्स :goaगोवा