लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा: खासदार सदानंद शेट तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 02:25 PM2023-08-06T14:25:48+5:302023-08-06T14:28:25+5:30

भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन.

start work for 2024 lok sabha election said mp sadanand shet tanavade | लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा: खासदार सदानंद शेट तानावडे

लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा: खासदार सदानंद शेट तानावडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळावे यासाठी जिल्हा पंचायत सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रावर लक्ष्य केंद्रीत करून कामाला लागावे, असे आवाहन राज्यसभेचे खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर येथे गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडू या राज्यातील भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे लक्षद्वीपचे अध्यक्ष कशमी, प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक गोविंद पर्वतकर, सरचिटणीस दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात विविध विषयांवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या दोन दिवशीय शिबिरात उपस्थित जिल्हा पंचायत सदस्यांनीही आपले विचार मांडावेत. काही प्रश्न, समस्या आणि अडचणी असतील तर त्या ही मांडाव्या, असे ते म्हणाले. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी मोदी सरकारला गेल्या नऊ केलेली विकासकामे, पक्षाची विचारधारा आणि पक्षाचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचववा, असे आवाहन खासदार शेट तानावडे यांनी यावेळी केले.

 

Web Title: start work for 2024 lok sabha election said mp sadanand shet tanavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.