शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सोहमला पुन्हा पोलिस कोठडी, कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:20 IST

सोहम नाईक याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण पाच गुन्हे नोंदविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क,पणजी / कुडचडे: कुडचडे येथील बहुचर्चित कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित सोहम नाईक याच्या अडचणीत वाढ झाली असून, एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेल्या सोहमला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सोहम नाईक याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण पाच गुन्हे नोंदविले आहेत.

या गंभीर प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सोहमची कार जप्त केली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेनेही तपासाचा भाग म्हणून त्याची कार ताब्यात घेतली आहे. गुन्ह्यासाठी या वाहनाचा वापर झाला असावा, असा पोलिसांचा संशय असून, त्या दृष्टीने आता पुरावे गोळा केले जात आहेत. पीडित मुलींना धमकावण्यासाठी किंवा या कृत्यांसाठी या वाहनाचा काही संबंध आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सोहम याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणे आणि त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे अत्यंत गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील गुंतागुंत पाहता आणि अधिक तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यासाठी संशयिताची कसून चौकशी करणे आवश्यक आहे. गुन्हे शाखेकडून आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, आगामी सहा दिवसांच्या कोठडीत या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखा व्हिडीओच्या शोधात 

संशयितावर ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितांना ब्लॅकमेलिंग करीत होता, असा त्याच्यावर ठपका असल्यामुळे हे व्हिडीओ पोलिसांना हवे आहेत. सोहमच्या फोनचे फॉरेन्सिक विश्लेषण अहवाल आल्यानंतर या बाबत पोलिसांच्या हाती काही तरी लागण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Soham Naik back in police custody; car seized in abuse case.

Web Summary : Soham Naik's troubles escalate in alleged sexual abuse case. Re-arrested, now facing five charges. Police seized his car, suspecting its use in the crimes, including blackmailing victims. Investigation intensifies to uncover the extent of the network.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी