शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद नाईक आज गोव्यात परतणार

By admin | Updated: May 29, 2014 07:18 IST

पणजी : केंद्रीय पर्र्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे गुरुवारी सायंकाळी चार वाजता दिल्लीहून गोव्यात परतणार आहेत.

पणजी : केंद्रीय पर्र्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे गुरुवारी सायंकाळी चार वाजता दिल्लीहून गोव्यात परतणार आहेत. खासदारपदी निवडून आल्यानंतर नाईक हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) म्हणून शपथविधी पार पडला. त्यांना पर्यटन व कला आणि संस्कृती ही खाती मिळाली आहेत. त्यानंतर आता प्रथमच ते गोव्यात परतत आहेत. सायंकाळी चार वाजता दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. भाजप कार्यकर्ते तिथे त्यांचे स्वागत करतील, असे सूत्रांनी सांगितले. नाईक यांच्याकडे पर्यटन व कला आणि संस्कृती ही महत्त्वाची खाती सोपविल्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना आनंद व्यक्त केला. गेली दहा वर्षे केंद्रातील काँग्रेसने गोव्यावर अन्याय केला. गोव्याला केंद्रात मंत्रिपद दिले नाही. श्रीपाद नाईक यांना राज्यमंत्रिपद व स्वतंत्र ताबा मिळाला आहे. ते केंद्रात कॅबिनेट मंत्री नसल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये भाग घेता येणार नाही; पण अन्य सगळे निर्णय ते स्वतंत्रपणे घेऊ शकतील. गोव्याला त्याचा लाभ होईल. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात साधनसुविधा आणखी वाढवून जगाच्या पर्यटन नकाशावर गोव्याचे नाव आणखी ठळक होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, केंद्राकडून यापूर्वी जो अनावश्यक निधी गोव्याकडे आला आहे, त्यापैकी काही निधी परत केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. जो निधी वापरणे शक्य नाही तो परत केला जाईल, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)