'मनाय' म्हणून काम करणाऱ्यांनाही सुरक्षाकवच; आरोग्य मंत्री विश्वजीत यांनी सांगितले नव्या कायद्यांचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:43 IST2025-08-23T07:41:57+5:302025-08-23T07:43:14+5:30
वाळपई मतदारसंघातील खोतोडे पंचायत क्षेत्रात गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम

'मनाय' म्हणून काम करणाऱ्यांनाही सुरक्षाकवच; आरोग्य मंत्री विश्वजीत यांनी सांगितले नव्या कायद्यांचे महत्त्व
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी: घरे कायदेशीर करण्यासह अन्य प्रकारचे जे नवे कायदे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आणले आहेत, त्या कायद्यांचा लाभ समाजाच्या तळागाळातील लोकांना होणार आहे. अगदी भाटकारांच्या घरी 'मनाय' म्हणून काम करणाऱ्या गोव्याच्या खऱ्या भूमीपूत्रांना देखील नव्या कायद्यांचा लाभहोईल, त्यांची घरे कायदेशीर होऊ शकतील, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे काल म्हणाले.
वाळपई मतदारसंघातील खोतोडे पंचायत क्षेत्रात शुक्रवारी गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम झाला. त्यावेळी मंत्री राणे यांनी हजारो लोकांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले.
'घरे कायदेशीर होतील'
मंत्री राणे म्हणाले, की अनेक वर्षे सामान्य माणूस, गरीब माणूस घरे कायदेशीर व्हायला हवी म्हणून प्रयत्न करत राहिले पण मुख्यमंत्री सावंत यांनी जे कायदे आणले आहेत, त्यातून घरे कायदेशीर होतील. भाटकारांच्या घरी 'मनाय' म्हणून काम करणारे देखील घर मालक होतील, असे राणे म्हणाले.
'पंतप्रधानांची विचारधारा आणखी पुढे नेणार'
सत्तरी तालुक्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा आम्ही आणखी पुढे नेणार आहोत. त्या विचारधारेचा आम्ही प्रचार व प्रसार करत राहू
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे. हे सरकार लोकांच्या रोजगाराची समस्याही सोडवील. त्यावर उपाययोजना करील. विकासाचे काम आम्ही पुढे नेऊ.
जनतेच्या कल्याणासाठीच राजकारण करायचे असते, असे मंत्री राणे म्हणाले. सत्तरी तालुक्यात प्रतापसिंग राणे यांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. ते काम आम्ही पुढे नेत आहोत, असेही विश्वजीत राणे म्हणाले.