मंत्री ढवळीकरांनी दिलेल्या धमकी प्रकरणी आरजीचे राज्यपालांना निवेदन
By पूजा प्रभूगावकर | Updated: March 12, 2024 16:53 IST2024-03-12T16:53:09+5:302024-03-12T16:53:24+5:30
सुदिन ढवळीकर यांनी त्यांच्याशी विनाकारण वाद केला व उघड धमकी दिली असा आरोप त्यांनी केला.

मंत्री ढवळीकरांनी दिलेल्या धमकी प्रकरणी आरजीचे राज्यपालांना निवेदन
पणजी: मडकई मतदारसंघातील बांदोडा ग्रामपंचायत क्षेत्रात पंचायत चलो अभियान ह्या कार्यक्रमावेळी रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) नेता विश्वेश नाईक यांना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेली कथित धकमी प्रकरण आता राज्यपालांपर्यंत पोहचले आहे.
या धमकी प्रकरणी अजूनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे आरजीचे आमदार विरेश बोरकर, नेता विश्वेश नाईक व पक्षाचे दक्षिण गोवा लोकसभा निवडणूकीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी मंगळवारी दोनापावला येथील राजभवनात जाऊन राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांना सादर केलेल्या निवेदन नमूद केले आहे.
आमदार बोरकर म्हणाले, की राज्य सरकारने पंचायत चलो अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतींना मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार बांदोडा पंचायत क्षेत्रात झालेल्या कार्यक्रमावेळी गावातील ग्रामस्थांचे प्रश्न मांडण्यासाठी आरजी नेता विश्वेश नाईक गेले होते. मात्र मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यांच्याशी विनाकारण वाद केला व उघड धमकी दिली असा आरोप त्यांनी केला.