शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जीसीएच्या कार्यालयावर छापा

By admin | Updated: June 19, 2016 20:26 IST

गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) कार्यालयावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून रविवारी छापा टाकण्यात आला.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 19 - गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) कार्यालयावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून रविवारी छापा टाकण्यात आला. या छाप्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जीसीएत 3 कोटी 13 लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणात अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केल्यावर जीसीएच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून झाडाझडती घेतली. जीसीएच्या पर्वरी येथील दोन्ही नव्या आणि जुन्या इमारतींवर एकाच वेळी हा छापा टाकण्यात आला. या छाप्यातून काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. संशयितांना अटक करून आठवडा होत आला तरी त्यांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतलेली नाही. जे मुख्य पुरावे मिळविण्यासाठी हा छापा टाकला होता, ती जीसीएची इतिवृत्तांत वही मात्र पोलिसांच्या हाती लागली नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही ती मिळाली नसल्याची माहिती सूत्रंकडून देण्यात आली. त्यामुळे हे छापासत्र चालूच राहणार असल्याचे संकेत असून, जीसीएच्या सदस्यांच्या घरीही छापे पडण्याची शक्यता आहे. 26 लाखांसाठी नोटीस बजावली होती; शेखर साळकर यांचा जबाब

जीसीएचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांचा जबाब पोलिसांनी रविवारी घेतला. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना पोलिसांनी केली होती. त्याप्रमाणे सकाळी 10.30 वाजता डॉ. साळकर आर्थिक गुन्हे विभागात हजर राहिले. त्यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. त्यांनी जीसीएच्या पदाधिका-यांकडून आपल्याला पाठविलेल्या ई-मेल्ससंबंधी आणि त्यांना आपण पाठविलेल्या ई-मेल्ससंबंधी माहिती दिली. बेकायदा काढलेले 26 लाख रुपये व्याजासह परतफेड करण्यासाठी देसाई व फडके यांना आपण नोटीस बजावली होती, असे त्यांनी जबाबात म्हटले आहे. आज महत्त्वाचे निवाडे

जीसीएच्या अटक केलेल्या संशयितांनी दाखल केलेल्या जामीन अर्जासंबंधी तिघा व्यक्तींनी सादर केलेली हरकत याचिका घ्यायची की नाही यावर आज, सोमवारी फैसला होणार आहे. हेमंत आंगले, विलास देसाई आणि प्रसाद फातर्पेकर या जीसीएच्या सदस्यांनी हे अर्ज केले आहेत. तसेच संशयितांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल केलेल्या, जामीन अर्जावर सुनावणी घेऊन लवकर निवाडा देण्याची सूचना कनिष्ठ न्यायालयाला करण्याची मागणी करणा-या याचिकेवरही आज निवाडा होणार आहे.