'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:48 IST2025-07-14T09:47:16+5:302025-07-14T09:48:23+5:30

उच्च शिक्षण संचालनालयाला स्पष्ट निर्देश.

prepare a special scholarship scheme for those gomantakiya said cm pramod sawant | 'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राष्ट्रीय संस्थांमध्ये अखिल भारतीय कोट्यातून निवड झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा, असे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

गोव्यातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोट्यातून अर्ज करावा व प्रवेश मिळवून गोवा सरकारच्या या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा, असेही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एम्स), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च (आयसीएआर), गोवा मेडिकल कॉलेज, गोवा डेंटल कॉलेज, ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक सायन्स, गोवा, एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खास शिष्यवृत्ती असावी.

नवीन शिष्यवृत्ती योजना आखावी

तर जागतिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वेगळी शिष्यवृत्ती हवी. मनोहर पर्रीकर गोवा शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर जागतिक ५०० क्रमांकाच्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि परदेशात पदवीपूर्व स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही नवीन शिष्यवृत्ती योजना आखावी, असेही मुख्यमंत्र्यांनी उच्च शिक्षण संचालनालयाला सांगितले आहे.
 

Web Title: prepare a special scholarship scheme for those gomantakiya said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.