पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 मार्चला गोव्यात सभा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:46 IST2019-02-25T18:46:19+5:302019-02-25T18:46:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या 7 मार्च रोजी गोव्यात होण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपला तशी कल्पना देण्यात आली असून भाजपने त्या दिशेने तयारी सुरू केली आहे.

The possibility of Prime Minister Narendra Modi rally in Goa on March 7 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 मार्चला गोव्यात सभा होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 मार्चला गोव्यात सभा होण्याची शक्यता

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या 7 मार्च रोजी गोव्यात होण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपला तशी कल्पना देण्यात आली असून, भाजपने त्या दिशेने तयारी सुरू केली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात पंतप्रधान गोव्यात येतील असे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी गोव्यातील भाजपला सांगितले होते. आता दि. 7 मार्चला पंतप्रधान येण्याची शक्यता जास्त दाट झाली आहे. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही पंतप्रधान 7 मार्चला येऊ शकतात, असे पत्रकारांना सांगितले. पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येतील व तिच त्यांची गोव्यातील मोठी सभा असेल, असे भाजपच्या सुत्रंनी सांगितले.

भाजपचे केंद्रीय नेते बी. एल. संतोष हे सोमवारी गोव्यात होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपची कुठपर्यंत तयारी चालली आहे याचा आढावा घेतला. भाजपच्या पणजीतील कार्यालयात त्यांनी 

भाजपच्या उत्तर गोवा लोकसभा निवडणूक समन्वय समितीची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर व अन्य पदाधिका:यांनी त्या बैठकीत भाग घेतला. पक्षाचे काम उत्तर गोव्यात ब:यापैकी आहे व उत्तरेची जागा आम्ही आरामात जिंकू असा सूर बैठकीत व्यक्त झाल्याचे सुत्रंनी सांगितले. मडगावला जाऊन बी. संतोष यांनी भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक समितीची बैठक घेतली. कोणत्या मतदारसंघात भाजपचे किती बळ आहे याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. भाजपला यापूर्वी सोडून गेलेले माजी मंत्री रमेश तवडकर यांनी सोमवारी भाजपमध्ये फेरप्रवेश केला.

दरम्यान, बी. एल. संतोष यांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाला भेट दिली व मुख्यमंत्री र्पीकर यांच्या तब्येतीविषयी त्यांनी विचारपूस केली. र्पीकर तिथे उपचार घेत आहेत.

Web Title: The possibility of Prime Minister Narendra Modi rally in Goa on March 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.