शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 9:46 AM

गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला आहे. सोमवारी (28 जानेवारी) राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले.

ठळक मुद्देगोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला आहे. सोमवारी राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले.30 जानेवारी रोजी न्यायालय आपला शिक्षेचा निवाडा देणार आहे.

मडगाव - गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला आहे. सोमवारी (28 जानेवारी) राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले. 30 जानेवारी रोजी न्यायालय आपला शिक्षेचा निवाडा देणार आहे. काब द राम येथे सहलीसाठी गेले असता दोन युवकांना बुडून मृत्यू आला होता. मृत्यू झालेल्या युवकांसोबत गेलेल्या अन्य युवकांविरुध्द गुन्हा नोंद करु अथवा एक लाख रुपये दयावे अशी मागणी भगत याने त्यांच्या पालकांकडे केली होती. यासंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर भगत याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

सरकारपक्षातर्फे सरकारी वकील एल. फर्नाडीस यांनी बाजू पाहिली. या खटल्यात एकूण एकवीस साक्षीदार तपासण्यात आले. 7 कलम 13 (2), कलम 13 (ब) भ्रष्ट्राचार प्रतिबंधात्मक कायदयाखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरविले. लाच प्रकरणाच्या वेळी भगत हा कुंकळळी येथील पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता.

8 जुलै 2011 रोजी अकरा जणांचा एक गट काब द राम येथे समुद्रकिनारी सहलीसाठी गेला होता. यावेळी झालेल्या दुर्घटनेत नोयल परेरा (17, फातोर्डा ) व सुनील रामचंद्रन (16, नावेली) या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. तर अजुम खान हा वाचला होता. कुंकळळी पोलिसांनी या घटनेच्या तपास करुन नंतर  एल्टन, मंदार, जोनाथन व अमर या मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून नंतर घरी पाठवून दिले होते. चौकशीच्या निमित्ताने वरील युवकांना पालकांसमवेत पोलीस ठाण्यात येण्यास बजाविले होते. भगत याने पुन्हा एकदा चौकशी केली व नतंर चारही युवकांच्या पालकांना आत बोलाविले. तुमच्या पाल्यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करु असे धमकाविले होते. एल्टन हा अल्पवयीन असल्याने त्याला मेरशी येथे अपना घरात पाठवून देउ असा दम भरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या युवकांच्या पालकांना आत बोलावून तुम्ही काय निर्णय घेतला आहे असे विचारले होते. या युवकांपैकी एका युवकाच्या वडिलांचा एक पोलीस शिपाई मित्र होता. तो त्याच पोलीस ठाण्यात कामाला होता. भगत याने पैशाची मागणी केली असता, एल्टनच्या वडिलांनी 50 हजार देऊ असे सांगितले होते. मात्र ही रक्कम कमी आहे असे सांगून एक लाख पाहिजे अशी मागणी भगत याने केली होती. नंतर भगत हा कार घेउन पैसे घेण्यासाठी कुंकळळी मार्केटमध्ये आला होता.

जेसन गोयस यांनी मागाहून मडगाव विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक उमेश गावकर यांच्याकडे या लाच संबधी लेखी तक्रार नोंदविली होती. कुंकळळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी मागाहून आपला अहवाल सादर केल्यानंतर दक्षिण गोव्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक अॅलन डिसा यांनी भगत याला सेवेतून निलंबित केले होते. खात्या अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस