शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

टँकरमधून पेट्रोल चोरताना गोव्यात तिघांना अटक; तर एक आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:30 PM

वास्कोहून राज्यातील अन्य भागातील पेट्रोलपंपाला इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरमधून पेट्रॉल चोरी करण्याच्या घटना घडू लागल्या असून, फातोर्डा पोलिसांनी अशाच एका घटनेत तिघाजणांना अटक केली आहे.

मडगाव: वास्कोहून राज्यातील अन्य भागातील पेट्रोलपंपाला इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरमधून पेट्रॉल चोरी करण्याच्या घटना घडू लागल्या असून, फातोर्डा पोलिसांनी अशाच एका घटनेत तिघाजणांना अटक केली आहे. एकजण फरार आहे. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या रिवण येथील भारत पेट्रोलियम पंपाला या टँकरमधून इंधन पुरवठा होत होता. मागच्या काही दिवसांपासून इंधनचा पुरवठा कमी होत असल्याचे फळदेसाई यांना आढळून आले होते. संशय बळावल्याने  काल त्यांनी आपल्या कामगारांना वास्कोहून इंधन घेउन येणा:या टँकरच्या  पाळतीवर ठेवले होते.

तसेच इंधन चोरताना या कर्मचाऱ्यांनी हा टँकर पकडला. मागाहून यासंबधी फातोर्डा पोलिसांना कळविण्यात आले. दस्तगिर पठाण ( झुआरीनगर) व कृपाशंकर पटेल (बोगमळा) व राजेश नाईक (मालभाट - मडगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  भारतीय दंड संहितेंच्या 379 कलमाखाली पोलिसांनी या संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. दस्तगिर हा टँकरचा चालक तर कृपाशंकर हा क्लिनर आहे. भारतीय दंड संहितेंच्या 379 कलमाखाली पोलिसांनी या संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहेत. 

वास्कोहून रिवणला जाण्यासाठी निघालेला हा टँकर पुर्व बगल मार्गावरील मडगावातील मारुती मंदिर नजिक टँकर पार्क केला. यावेळी तेथे दोघेजण गॅलन घेऊन आले होते. टँकरमधून गॅलनमध्ये पेट्रोल भरताना फळदेसाई यांच्या कामगारांनी त्यांना पाहिले. टँकर चालकाला यासंबंधी विचारले असता, आपली चोरी उघडकीस आल्याचे पाहून  त्या दोघाजणांनी घटनास्थळाहून पळ काढला. यातील राजेशला मागाहून पोलिसांनी अटक केली तर अन्य एक फरार आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सानिल बावकर हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत.दरम्यान, सुभाष फळदेसाई यांनी लोकमतशी बोलताना इंधन चोरीच्या घटनेमागे संघटीत गँगचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. वाटेत टँकर थांबवून इंधनची चोरी केली जाते व पंपावर टॅकर आणताना इंधनाचे माप ठरविक पध्दतीने वाढवून ही लूट केली जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवाPetrolपेट्रोल